कोळंबी मसाला ..
मी शुद्ध शाकाहारी न नवरा पक्का मांसाहारी आहे :( म्हणून असे उपदव्याप करायला शिकतेय हळूहळू
कोळंबीला कधी हात हि न लावलेली मी ,शेंडा कोणता न बुडुख कोणते न कळणारी मी, हे सहज बनवू शकते तर कोणीही बनवू शकेल नक्किच :)
साहित्य :
सुके प्रॉन्स / कोलंबी ( मी एक डिश भर घेतल्यात )
३ सुक्या बेडग्या मिरच्या
५-६ लसूण पाकळ्या
आले तुकडा एक इंचभर
चिंच एक बुटुक
ओला नारळ - १ वाटी
टॉमॅटो बारीक चिरून -अर्धी वाटी
कांदा बारीक चिरलेला - अर्धी वाटी
हळद अर्धा छोटा चमचा
लाल तिखट अर्धा छोटा चमचा
कोथिंबीर सजावटीला
मीठ चवीपुरते
कृती :
ड्राय कोलंबी तव्यावर कोरड्या भाजून घ्याव्यात , त्याचे डोके खुडून टाकावे
आता मिक्सर मध्ये मिरच्या ,नारळ , लसूण , आलं , चिंच यांचं थोडं पाणी घालून वाटण करून घ्याव
कढईत २ चमचे तेल घेऊन त्यात कांदा परतावा कांदा सोनेरी झाला कि टॉमेटो परतून घावा .तेल सुटू लागलं कि लाल तिखट , हळद न चवीनुसार मीठ घालावं परतून घेऊन त्यात वाटण घालून एकजीव करावं न मग त्यात भाजल्या कोलंबी घालून मिश्रण हलक्या हातानं एकजीव करावं न कोथिंबीर घालून सजवावे :) शंपी रेसेपी :) फोटू काढूपर्यंत नवर्यानी अर्धी डिश फस्त केली होती , म्हणून कशी बशी अर्धी वाटी का होईना फोटॊपूर्ती उधार घेऊन संपवलं एकदाच :)




