नमस्कार!
यंदाच्या दिवाळी अंकाच्या पूर्वतयारीसाठी हा धागा.
विषय
सासंने चर्चेअंती "व्यक्तिचित्रं" हा विषय विशेष विभागासाठी ठरवला आहे. अर्थात या विषयाला सोडून अन्य साहित्याचंही (नेहेमीप्रमाणे) स्वागतच आहे.
तारखा
वसुबारसः सोमवार १६ ऑक्टोबर
∴ अंक प्रकाशनः रविवार १५ ऑक्टोबर
∴ एक आठवडा आधी अंक प्रकाशनासाठी तयार पाहिजे - सोमवार ९ ऑक्टोबर
∴ लेख देण्याची शेवटची तारीख - शनिवार ३० सप्टेंबर
अनेक वाचकांनी अंक टप्प्याटप्प्याने प्रकाशित व्हावा म्हणजे कोणत्याही साहित्यावर अन्याय होणार नाही असं सुचवलं आहे. ही सूचना नक्कीच ग्राह्य धरण्याजोगी आहे. त्यामुळे अंक सोमवार ९ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने प्रकाशित करावा असा विचार आहे.
टीम्स आणि प्रक्रिया
दिवाळी अंकात सासंबरोबर इतरांचा सहभागही असतो (आणि असायला पाहिजे). दर वेळी काही स्वयंसेवक आपणहून सामील होतात. त्यासाठी अंकाचं सगळं काम "मिपासंवाद"मध्ये करावं असं वाटतं. (प्रशांत सेपरेट "अंकचावडी" काढून देणार आहेत. त्यावेळी ही सगळी चर्चा तिकडे हलवू.)
दिवाळी अंक टीम ही एकत्र काम करत असली तरी त्यांच्यात कामानुसार उपटीम्स असतात. प्रत्येक चमूत कोणाला काम करायचं असल्यास कृ० खाली प्रतिसादात तसं कळवणे.
लेखन चमू
या चमूचं काम म्हणजे आलेलं लेखन अंकापर्यंत पोचवणे.
प्रक्रिया: लेखन येणे --> लेखकाला पोच देणे --> मिपासंवादमध्ये प्रकाशन करणे --> मिपासंवादमध्ये मतदान (घेणे / न घेणे, चित्र हवं / नको) --> मुशो --> फायनल प्रकाशनयोग्य धागा बनवणे (डेडलाईन ३० सप्टेंबर)
स्नेहांकिता (+संकलन +अनुक्रमणिका), यशोधरा, जव्हेरगंज, नूलकरकाका (+मुशो), एस, पद्मावति
सजावट चमू
या चमूचं काम म्हणजे अंकात चित्रं, बॉर्डर, सजावट वगैरे करणे. अंकाच्या जाहिराती आणि मुखपृष्ठही.
प्रक्रिया: चित्र/सजावट सुचवणे --> मिपासंवादमध्ये सगळ्यांची मतं घेणे --> चित्र/सजावट बनवणे --> फायनल धाग्यात घालणे (डेडलाईन ३० सप्टेंबर)
नीलमोहर, अभ्या (मुखपृष्ठ फक्त) नीमो आणि अभ्या: चर्चेअंती तारखा इ० ठरवून कृ० या धाग्यावर अपडेट करावे.
प्रसिद्धी चमू
या चमूचं काम म्हणजे अंकाची प्रसिद्धी मिपावर आणि मिपाबाह्य ठिकाणी करणे.
प्रक्रिया: सजावट चमूबरोबर जाहिराती / राईटप फायनल करणे --> ते विविध ठिकाणी झळकवणे
वेल्लाभट (ट्विटर), पद्मावति (फेसबुक), पैसा (फेसबुक), पैलवान
साधारण १ ऑक्टोबरपासून प्रसिद्धी सुरू केल्यास ती जास्त इफेक्टिव्ह ठरेल.
तांत्रिक चमू
या चमूचं काम म्हणजे धागे फायनल झाल्यावर त्यावरच्या प्रतिक्रिया हटवून प्रकाशित करणे. तसंच, अन्य टीमना काही तांत्रिक अडचण आल्यास त्या सोडवणे.
नीलकांत, प्रशांत
------------
प्रत्येक सासं किमान एका तरी चमूमध्ये सहभागी आहेच. संपादक किंवा सल्लागार यांना कोणत्याही चमूत सहभागी व्हायचं असल्यास तसं खाली प्रतिसादामार्फत सांगावं. तसंच, संमं + सासंमं + सल्लागार या व्यतिरिक्त कोणी स्वयंसेवक सहभागी होऊ इच्छित असल्यास कृ० या धाग्यावर तसं कळवावं.