सर्वप्रथम हा धागा चुकीच्या ठिकाणी असल्यास क्षमस्व. सदाहरित धागा गूगल वर शोधून बघितला पण सापडला नाही. तसेच प्रश्नोत्तरे सदरात Access Denied असे लिहून आले.
काल मोबाईल( मोटो जी ४+) पाण्याच्या बाटली जवळ ठेवला होता. अचानक बाटलीला धक्का लागून पाण्याने मोबाईलला अंघोळ घातली. त्यानंतर मी पहिली चूक (मोबाईल सुरु करून पाहणे) केली. फोन सुरु होत नव्हता. त्याला कोरडे केले. ड्रायर ने वाळवण्याचा प्रयत्न केला. शेवटी तांदुळात ठेऊन दिला. संध्याकाळी दुसरी चूक केली ती म्हणजे चार्जिंगला लाऊन पाहणे.
आज सर्विस सेंटर ला घेऊन गेलो. एक तास वाट बघायला लावल्यावर त्याने ७५०० लागतील असे सांगितले. मोबाईलला ११ महिने असूनही पाण्यामुळे वॉरंटी लागत नाहीआणि पूर्ण मदरबोर्ड बदलावा लागेल असे बोलला. आधी लॅपटॉप प्रकरणात भाजून घेतल्यामुळे ( काहीच बिघडले नसतांना अव्वाच्या सव्वा रेट सांगणे ) सेकंड ओपिनिअन घेण्याचे ठरवले. एका दुकानात गेलो आणि पुन्हा एक तास वाट बघून झाल्यावर तो ३५०० लागतील कारण डिस्प्ले गेलाय असे बोलला.
या अगोदर कधी मोबाईल भिजला नाही त्यामुळे काय करावे ते समजत नाहीये. मिपाकर अशावेळी काय करतील/करतात?
पर्याय १ : सर्विस सेंटर ला परत जाणे - पण १३००० च्या मोबाईलला ७५०० लावणे परवडणार नाही. त्यापेक्षा दुसरा स्वस्त घेता येईल.
पर्याय २: दुकानात जाणे - पण भरोसा नाहीये हो.
पर्याय ३: तीन हजारापर्यंत नवा घेणे आणि पुन्हा कधी महाग मोबाईलचे नाव न काढणे.
अजून एक शंका अशी कि सध्या आयडियाचा ४०४ चा पॅक मारून ठेवला आहे. त्याचे काय करावे नेतसेटर मध्ये ४जि सीम बसेल का? सध्या सीम आपल्या मिस्टर डिपेंडेबल नोकिया ५२३३ मध्ये चालवत आहे(जो आतापर्यंत अडगळीत होता. आणि विकण्याचा विचार सुरु होता.).
-आपला राक्षस