बाप्पाचा नैवेद्यः केळ्याच्या पुर्‍या

साहित्यः

चांगली पिकलेली ३ केळी,
अर्धी वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता),
यात मावेल एवढी कणीक,
तळण्यासाठी तेल.

कृती:

केळी छान कुस्करून घेउन त्यात साखर घालावी.
गॅसवर ठेवून सतत हलवत रहावे.
२-३ मिनिटांत साखर विरघळली की गॅस बंद करून मिश्रण थंड होउ द्यावे.
नंतर या मिश्रणात बसेल एवढीच कणीक घालून (मला दीड वाटी कणीक लागली) घट्ट पीठ भिजवून ठेवावे.
साधारण अर्ध्या तासाने कणीक खूपच घट्ट वाटली तर दुधाचा शिपका मारून कणीक सारखी करून नेहमेसारख्या पुर्‍या लाटून तळून घ्याव्यात.
या पुर्‍या अजिबात पाणी नसल्याने बर्‍याच टिकतात. त्यामुळे प्रवासात वगैरे सहज नेता येतात. अगदी खुसखुशीत होतात. छान लागतात.

शेवटी बाप्पा खूष तर आपणही खूष. नाही का?

1