बरेच दिवसांपासुन ओरिगामीचा वापर करुन काहितरी क्रिएटिव करायचे मनात होते. यंदा हा योग आला . ओरिगामी मॉड्युलर क्युब वापरुन ही
गणेश सजावट केली आहे. सुमारे २७० क्राफ्ट पेपर वापरुन ४५ क्युब तयार करुन त्यांची मांडणी करुन ही सजावट केली आहे.
इतर साहित्य कार्डबोर्ड पेपर आणि चिकटपट्टी . हि सजावट दोन महिन्यांपासुन चालू होती. रोज १ ते २ क्युब करुन नंतर ही मांडणी केली.
सजावट करतानाचा प्रत्येक क्षण खुपच आनंददायी होता.
ओरिगामी मोड्युलर ठोकळा करणे अतिशय सोपे असुन एक ठोकळ्याला किंवा घनाला ६ चौरस आकाराचे कागद लागतात.


