१ एप्रिल पासून ज्या नव्या BS ४ दुचाक्या बाजारात आल्या आहेत त्यांना पुढचा दिवा चालू/बंद करण्याचे बटनच नाही. त्यामुळे गाडी चालू केली की दिवसा पण दिवा सतत चालू राहतो. या BS ४ निकषामागचे कारण समजेल का?
मला ही उर्जेची उधळपट्टी वाटते. भर उन्हाळ्यात अशा हजारो वाहनांचे दिवे दिवसा चालू असताना तापमान् वाढही होणार नाही का? जाणकारांनी खुलासा करावा.
मूलभूत वाहन नियमांनुसार दिवसा दिवा लावणे याचा अर्थ " मला खूप घाई आहे, तेव्हा पुढे जाउ द्या" असा असतो.
निदान मोटारींना तरी असे काही केले नसावे ही अपेक्षा.