राम राम मंडळी ,
"पालक" हा बहुतेक लोकांना आवडत नाही त्यात मी पण एक प्राणी :) पण हळू हळू मिहि खायला शिकतेय. असा नाही तर तसा पालक पोटात जायला हवा म्हणून काहीतरी वेगळं न चवीला पण बर अस करावं म्हणून आंजावर शोध शोध शोधून माझ्या मैत्रिणीचं डोकं खाऊन "पालक पुरी"बनवण्याचा घाट घातला न तो पहिल्या प्रयत्नातच इकडच्या स्वारीला न मला पसंत पडला ;)तर मंडळी घ्या साहित्य.
साहित्य :
एक जुडी पालक
कणिक ( अदमासे म्हणजे मावेल तितकी )
लसूण ठेचून - २ चमचे
बेसन पीठ - ३ चमचे
तीळ ( आवडीनुसार)
ओवा - १ चमचा
धना जिरे पावडर - १ चमचा (ऑप्शनल )
लालतिखट ( आवडीनुसार तुमच्या हिशोबाने )
मीठ चवीनुसार
कृती : पालक धुवून, स्वच्छ करून त्याची पाने ५ मिनिट उकळून घ्यावीत न मिक्सी ला फिरवून प्युरी करून घ्यावी. आता या प्युरीत मावेल तितकी कणिक न वरील सर्व साहित्य मिसळून एकजीव मळून घ्यावी मिश्रण थोडं घट्ट असेल तरी चालेल आता हे मिश्रण १५ मिनिट रेस्ट करायाला ठेवून द्यावे मग ह्या कणकेचे उंडे करून गोल पोळी लाटून एकसारख्या पुऱ्या वाटी किंवा ग्लासच्या सह्याय्याने कापूंन घ्याव्यात नाहीतर छोट्या छोट्या पुर्या लाटून तेलात खरपूस तळून घ्याव्यात .



कधी रिमझिम तर कधी धो धो कोसळणाऱ्या पावसाबरोबर एखाद्या संध्याकाळी आलं घातलेल्या वाफाळत्या चहाच्या कपा बरोबर ह्या पुरीचा आस्वाद घ्यावा :) हि पुरी गरमागरम मस्त लागतेच शिवाय २,३ दिवस टिकते तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता ..

