भंडारदर्याला जाताना (मागच्या वर्षी) भयंकर पाऊस अनुभवला. एका ठिकाणी तर पुलावरून पाणी वहात असल्यामुळे थांबावे लागले व शेवटी पोलिसांच्या देखरेखीखाली पाण्यात गाडी घालावी लागली. त्याचे खालील छायाचित्र. समोर दिसतोय तो रस्ता आहे. पाण्याखाली गेलेला....
छायाचित्रे जरा मोठ्या आकाराची आहेत. उघडण्यास जरा वेळ लागेल. पण पावसाळ्यातील छायाचित्रे पावसाळ्यात टाकायची नाहीतर केव्हा ? म्हणून आत्ता टाकली आहेत. एखादे परत टाकले गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही... :-)
घाटघरला जाताना...
येथे मला थोरोच्या वॉल्डनची आठवण अत्यंत प्रकर्षाने झाली. वाटले ही पाऊलवाट चढून गेले की माझे वॉल्डन मला सापडेल...
वरुन दिसणारे एक दृष्य....
भंडारदर्याच्या जलाशयाच्या काठावर बोटी विश्रांती घेताना...
रतनवाडीच्या देवळाचा एक खांब...
मुख्य दार... पण खरंतर हे मागचे दार असावे..

शेवटचे... मागच्याच वर्षी अहुप्याला जाताना या दृष्यावरुन माझी नजरच हटेना. संध्याकाळ झाली होती. सूर्याची किरणे दाटणार्या काळोखाला मान देऊन माघार घेत असताना काढलेला हा फोटो...
जयंत कुलकर्णी.







