महाराष्ट्र दिन २०१७ : चारोळी स्पर्धा

सालाबादप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र दिन १ मे (सोमवार) रोजी आहे :) . त्यानिमित्ताने आपल्याला चारोळी स्पर्धा घेता येईल, असा एक विचार सा सं whatsapp ग्रुपवर आला होता.
थोडक्यात रूपरेषा अशी असावी:

स्टार्ट-एंड पॉईंट्स
स्पर्धा जाहीर 24 एप्रिल
स्पर्धा संपणार 30 एप्रिल
निकाल 1 मे

तांत्रिक तपशील-
महाराष्ट्र दिन चारोळी स्पर्धा २०१७
स्पर्धक धाग्यावर (मतदान नसल्याने व्यनि ची -ओळख गुप्त ठेवण्याची गरज नाही, असे वाटते. तसं करायचं असल्यास सा सं ला व्यनि करता येईल) चारोळ्या टाकतील.
२४ एप्रिल ते ३० एप्रिल चारोळ्या देता येतील.
पुढील ३ मान्यवर परीक्षक असतील:



३० एप्रिल च्या रात्री किंवा १ मेला लवकर ते स्वतःचा निकाल देतील.(इतर स्पर्धांच्या मतदानाच्या धाग्यावर सदस्य जसे मतदान करतात तसे ३ ते पाच क्रमांक)
त्यावरून सा सं निकाल जाहीर करतील.

टीम


वेळापत्रक
२४ एप्रिल स्पर्धेचा धागा मुख्य बोर्डावर
३० एप्रिल भाप्रवे सं. ६.०० चारोळ्या देण्याची अंतिम वेळ
१ मे सकाळ पर्यंत मान्यवर परीक्षकांनी निकाल द्यावा.
दुपारपर्यंत सा सं ने निकाल जाहीर करावा.
_________________________________________
मला अनुभव नसल्याने समन्वयक म्हणून काम करणे जमेल की नाही माहिती नाही. मी तूर्तास फक्त प्रस्तावक आहे. समन्वयक, कार्यकारी टीम, परीक्षक ही नावे आपण इथे ठरवू.
_________________________________________

महाराष्ट्र दिनाची स्पर्धा असल्याने त्या दिवशी निकाल जाहीर करणे उचित होईल, म्हणून थोडी घाई करावी लागेल.
खूप जास्त घाई होतेय (वेळेअभावी) तर हा प्रकल्प तात्पुरता/कायमचा गुंडाळता येईल/किंवा महाराष्ट्र दिन विशेष म्हणून ना ठेवता, स्वतंत्रपणे राबवता येईल.