सासं उपक्रम कसा राबवायचा - प्रमाण कार्यपद्धती अर्थात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एस ओ पी)

कॅप्टनने इथे दिलेल्या एसओपीवर पुढे काम करत आहे. क्यालेंडरच्या धाग्यावर चर्चा हरवायला नको म्हणून नवा धागा.

नवा कोरा, सासंने पूर्वी कधीही न केलेला उपक्रम

१. सासंचावडीत प्रस्तावकाने स्वतःच्या आयडीने वेगळा धागा करून कल्पना मांडा.
२. नीलकांतने तो प्रस्ताव बघून त्याला सासंचावडीत प्रतिसाद देऊन मान्यता द्यावी.२
३. बाकी सासंनी त्या धाग्यात मेंदूवादळ करा.
४. किमान सत्तर टक्के सासंनी कल्पनेला पाठिंबा दिला तर पुढच्या पायरीला जा.
५. उपक्रमाचा/चे मुख्य समन्वयक ठरवा. प्रस्तावकाने मुख्य समन्वयक असणं गरजेचं नाही.
६. मुख्य समन्वयकाने तांत्रिक तपशील प्रशांतला कळवून त्यांच्याकडून ते मान्य करून घ्यावे.
७. मुख्य समन्वयकाने तपशीलवार आराखडा करून सासंचावडीत मांडावा. तपशीलवार आराखड्यात स्टार्ट-एंड पॉईंट्स, तांत्रिक तपशील, टीम, वेळापत्रक वगैरे असावं.
८. कॅलेंडरमध्ये तो उपक्रम नोंदवला जावा.
९. मुख्य समन्वयकाने कामाला सुरुवात करावी.
१०. मुख्य समन्वयकाने वेळोवेळी उप्दते चावडीत कळवत जावा.
११. उपक्रमाच्या पब्लिक धाग्यांवर सासं या भूमिकेतून प्रतिसाद सासं या आयडीने टाकावेत.
१२. उपक्रम संपल्यावर मुख्य समन्वयकाने उपक्रमाच्या यशापयशाबद्दल लिहावं.

पूर्वी केलेला उपक्रम
१. उपक्रमाचा/चे मुख्य समन्वयक ठरवा.
२. मुख्य समन्वयकाने तपशीलवार आराखडा करून सासंचावडीत मांडावा. तपशीलवार आराखड्यात स्टार्ट-एंड पॉईंट्स, तांत्रिक तपशील, टीम, वेळापत्रक वगैरे असावं.
३. मुख्य समन्वयकाने कामाला सुरुवात करावी.
४. मुख्य समन्वयकाने वेळोवेळी उप्दते चावडीत कळवत जावा.
५. उपक्रमाच्या पब्लिक धाग्यांवर सासं या भूमिकेतून प्रतिसाद सासं या आयडीने टाकावेत.
६. उपक्रम संपल्यावर मुख्य समन्वयकाने उपक्रमाच्या यशापयशाबद्दल लिहावं.