नमस्कार मंडळी,
आजच्या दिवसातला हा दुसरा धागा ;) बुधवारी मला साप्ताहिक सुटी असल्यासारखेच असते लोड शेडिंगमुळे.
येनीवे, धाग्याचा मुद्दा हा की ह्या धाग्यात आपण आपले स्ट्रॉन्ग अन वीक पॉइन्ट्स मांडूयात. म्हणजे कसे आहे की आपण एकमेकाना मिपाकर म्हणून ओळखतो पण काही गोष्टी आपण रोजच्या व्यवहारात सवयीने पार पाडत असतो. उदा. मी रोजच्या व्यवहारात ग्राफिक डिझाइनचेच काम करतो. प्रुफ रिडिंगची मला सवय आहे. नूलकरदा प्रोफेशनल प्रुफरीडर आहेत, आदूबाळ परफेक्ट रीडर प्लस प्लानर आहे. जव्हेरभावचा वावर आंतरजालावर भरपूर आहे. त्यांचे लक्ष चौफेर असते. एसमास्टर यांची मेमरी स्ट्रॉन्ग आहे. त्यांना बर्याच गोष्टी/धागे आठवत असतात. साहित्य संपादनाची जबाबदारी आता आपल्यावर आहे तेंव्हा अशा काही गुणांचा मिपाला उपयोग कसा होईल हे खूप महत्त्वाचे आहे. आगामी उपक्रमात जबाबदार्यांचे वाटप करण्यासाठी ह्या माहीतीचा उपयोग होईल असे मला वाटते. ह्यामध्ये वैयक्तिक माहीती अपेक्षित नाहीये तर आपले स्ट्राँग-वीक पॉइन्ट्स जे मिपासाठी उपयोगी पडू शकतील ते विषद केले तरी बस्स आहे.
तर मी माझ्यापासूनच सुरुवात करतो.
१) ग्राफीक डिझायनिंग करु शकतो, चित्रे काढू शकतो.
२) शॉर्टमध्ये मसुदे लिहू शकतो. ;) पब्लिशिंगची हेवी कामे वेळेनुसार करु शकतो.
३) कॅची हेडलाइन्स किंवा टायटल्स देऊ शकतो.
४) खूप वेगाने वाचन करुन प्रुफरिडिंग करतो म्हणजे डोळ्याला चुका लगेच जाणवतात.
५) माझा वेळ मात्र अडनिड असतो. सलग वेळ मिळत नाही. रात्री पूर्ण करु शकतो कामे.
६) मला एचटीएमएल प्रोग्रामिंग वगैरे कळत नाही.
७) वेबसाईटचे डिटेल्स/प्रोसेस माहीत नसतात.
७) वर्षातले काही दिवस माझ्या व्यवसायासाठी महत्वपूर्ण असतात. उदा. दिवाळी, जुलै/ऑगस्ट, लग्नसराई, मार्चएंड. तेंव्हा मी फारसा उपलब्ध होईल याची खात्री नसते.
.
सो माझ्या ह्या पॉइन्ट्सचा मिपासाठी मॅक्सीमम वापर करेनच.