नमस्कार, आणि नवीन सासंमंडळाचं स्वागत!
२०१७च्या विविध उपक्रमांसाठी आगोदरपासून तयारी असावी या हेतूने खालील कॅलेंडर डकवत आहे. आत्ता यात फक्त श्रीगणेश लेखमाला आणि दिवाळी अंक आहेत.

खालील कामं ठरवूया:
१. या दोनव्यतिरिक्त उपक्रम ठरवणे (साधारणपणे महिन्याला एक असावा, पण तशी काही सक्ती नाही.)
२. प्रत्येक उपक्रमाकरता सासंमधला मुख्य समन्वयक ठरवणे
३. प्रत्येक उपक्रमासाठी इतर काही इन्फ्रास्ट्रक्चर लागेल का याचा शोध घेणे (उदा० काही तांत्रिक गोष्टी वगैरे.)