लेखजोडणी करण्याची प्रक्रिया खाली लिहिल्याप्रमाणे सुलभ आहे. लेखमाला संपलेली नसेल तर दर नवीन भागाला याच प्रक्रियेने जोडता येईल.
१. प्रथम भाग किंवा मुखपृष्ठ.
द्रुपलच्या संहितेनुसार मुखपृष्ठासाठी स्वतंत्र नोड किंवा पान असावे. लेखजोडणी अनुवादित पुस्तक किंवा तत्सम मोठ्या अधिक महत्वाच्या प्रकारची असेल तर साहित्य संपादक मंडळाने जरूर स्वतंत्र पान बनवावे. असे पान बनवले तर त्यावर मुखपृष्ठाचे चित्र, थोडक्यात ओळख किंवा लेखकाचे मनोगत असावे.
अन्यथा लेखमालेचा पहिला भाग मुखपृष्ठ म्हणून गृहीत धरावा.
-धाग्याच्या संपादन टॅबवर क्लिक करून खाली स्क्रोल करा.
-खाली दिसणाऱ्या उभ्या टॅब्सपैकी 'बुक आऊटलाईन' या टॅब वर क्लिक करा.
-दिसणाऱ्या दोन ड्रॉपडाऊन पैकी 'book' मध्ये 'create new book' हा पर्याय निवडावा.
- 'weight ' मध्ये 0 हाच आकडा राहू द्यावा. इथे पुस्तकाचे नाव धाग्याचे संपादन पूर्ण होईपर्यंत दिसणार नाही. संपादन पूर्ण झाले की धाग्यात वरच्या उजव्या कोपर्यात अनुक्रमणिका ऑप्शन दिसेल आणि पुढच्या धाग्यांची जोदणी करताना यादीमध्ये पुस्तकाचे नाव दिसू लागेल.

२. पुढील भाग.
द्रुपलच्या संहितेनुसार पुस्तक पानांसाठी पुस्तक निवडणे गरजेचे आहे. तसे 'weight ' हा पर्याय निवडून पान क्रमांक निवडता येईल.
-धाग्याच्या संपादन टॅबवर क्लिक करून खाली स्क्रोल करा.
-खाली दिसणाऱ्या उभ्या टॅब्सपैकी 'बुक आऊटलाईन' या टॅब वर क्लिक करा.
-दिसणाऱ्या दोन ड्रॉपडाऊन पैकी 'book' मध्ये या लेखमालेचा पहिला भाग निवडावा.
-निवड झाल्यावर Parent item हा नवा ड्रॉपडाऊन दिसेल. त्यात आपोआप पुस्तकाचे नाव निवडलेले असेल, ते तसेच राहू द्यावे.
- 'weight ' मधील आकडा निवडण्यासाठी भाग क्रमांक वजा दोन हे सूत्र वापरावे. पहिल्या आणि दुसऱ्या भागाला 'weight ' शून्य आणि पुढे २,३,४ असे वाढत जाईल.
