चलती का नाम गाडी...

car

हल्ली आपल्या आजूबाजूला बऱ्याच प्रकारच्या आणि बऱ्याच श्रेणी मधल्या अनेक चार चाकी गाड्या पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्याविषयी फारसे अप्रूप राहिलेले नाही. पण आपल्या पैकी बऱ्याच जणांना गाडी नक्की कशी चालते किंवा त्यामध्ये येत राहणाऱ्या नवनवीन सुविधा कशा काम करतात याविषयी पूर्ण माहिती असेल असे नाही.
या धाग्याचा उद्देश गाड्यांविषयी किंवा त्यामधल्या कोणत्याही तांत्रिक बाबींविषयी प्रश्न विचारून त्याची उत्तरे शोधण्याचा आहे.

पहिली गाडी बनवून आता जवळपास सव्वाशे वर्षे उलटून गेली आहेत! पण अजूनही बहुतांश गाड्या जैविक इंधनावर चालतात.
हायब्रीड किंवा इलेकट्रीक हि नावे कानावर येत राहतात पण रस्त्यावर तितक्या प्रमाणात येत नाहीत! यामागेही अनेक कारणे आहेतच...
अशाच प्रश्नांवर चर्चा होऊन या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी अधिकाधिक माहिती इथे देत राहावी, त्यामुळे कदाचित काही विद्यार्थ्यांनाही फायदा होऊ शकेल.

आता, मला पडलेला एक प्रश्न...
कोणतीही चारचाकी गाडी airtight असते का? म्हणजे सगळ्या काचा आणि दारे लावून घेतली आणि ac बंद असेल तर बाहेरची हवा कुठून आत येऊ शकते का?
कारण बऱ्याचदा वाचण्यात येते कि गाडीमध्ये झोपलेल्या लोकांचा गुदमरून मृत्यू होतो. यामागचे मूळ कारण ऑक्सिजन चा अभाव असतो का?

पण मग गाडी पाण्यात पडल्यावर बुडते देखील! गाडीमध्ये पाणी शिरते म्हणजे गाडी मध्ये हवा शिरायला देखील जागा असणारच!
मग असे असेल तर गाडी मध्ये गुदमरून मृत्यू होण्याचे नक्की कारण काय असेल?