मिपा कथासंग्रह २०१७
नमस्कार,
सहज विचार आला म्हणून एक कल्पना मांडतोय.
मिपावर उत्तमोत्तम कथा नेहमीच येतात. त्यातल्या काही असामान्य आणि दर्जेदार असतात. वर्षभरात आलेल्या या कथांमधून काही निवडक कथांचा आपण संग्रह काढू शकतो काय?
संग्रह पीडीएफ स्वरुपात असावा. (लेखकांची परवानगी गृहीत धरली आहे)
याचे फायदे खालीलप्रमाणे असतील,
1.आवाहन करायची गरज नाही. अगोदरच प्रकाशित झालेल्या कथांतून निवड करायची आहे. (किंवा लेखकसुद्धा आपापल्या कथांची शिफारस करु शकतात.)
2.पीडीएफ स्वरुपातला अंक आंतरजालावर फिरुन मिपाला नवे वाचक/सदस्य मिळू शकतात.
(कथा हा लोकप्रिय प्रकार असल्याने हे जास्तीत जास्त घडण्याची शक्यता आहे)
3. संग्रहात कथा आल्याने त्या त्या लेखकांना तसेच इतरांना नवे साहित्य लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल.
4. मिपावरील अडगळीतला खजिना सर्वांसाठी खुला होईल. (हे महत्त्वाचं आहे)
[हे असंच कवितांसाठीही करता येईल. किंवा पाककृतीसाठीही लागू होईल.]
याविषयी आपले मत जाणून घेण्यास आवडेल.