Utterly Butterly

.

इ. स. १९६६ला अवतरली ही बाला ..
लागे पोस्टर्स चहूकडे अमूलचा बोलबाला

निळे केस, लाल गाल, पोलका डॉट फ्रॉक न भलीमोठी हेअरपिन,
गोडुली, बबली, छबिली, बिना नोजवाली ब्युटी क्वीन

क्रिकेट, सिनेमा, राजकारण, सीमा प्रश्न, युद्ध ..
अमूल गर्लच्या दोन ओळी वाचून येते हरपलेली शूद्ध

कधीकधी खुसखुशीत, कधीकधी गोड लाथा
अमूल गर्लच्या तोंडी आपल्या मनीच्या बाता

कधी खेळी, कधी कोपरखळी ..
कधी गंभीर, कधी खुळी ..

कधी काढे विकेट, कधी हाणें टोला
ज्वलंत मुद्द्यावर नेहमीच
विचार करण्याजोगा स्लोगन आला ..

कच्ची उमर की ये बच्ची कर चली साल पुरे पचास
अमूल गर्ल न तिचे टू-लाइनर्स सदैव आमच्यासाठी ख़ास

अरे ऐसा मस्का और कहा मिलेगा
जब तक हे अमूल, तब तक ये कारवाँ ऐसेही चलेगा

वेगवेगळे विषय न वेगवेगळ्या गेटअपमध्ये येई सदैव भेटीला
सगळ्यांनी किती किती जीव लावला ह्या छोटू नकटीला

छोटुश्या सखीला देऊ गुड़ गुड़ wishes ....
म्हणुनिया सारे जण "utterly butterly delicious……"

.