(३) डेटा लॉस - ऑपरेटिंग सिस्टम ने हार्ड डिस्क डिटेक्टच केली नाही तर

"आता ऑपरेटिंग सिस्टम ने हार्ड डिस्क डिटेक्टच केली नाही तर ? "

या पूर्वीच्या सॉफ्टवेअर प्रोसेस आपण घरच्या घरी करू शकतो. आता या पुढील प्रोसेस , महत्वाचा डेटा असलेल्या हार्डडिस्क वर करू नये. काही प्रश्न असल्यास इथे विचारावेत.

ऑपरेटिंग सिस्टम ने हार्डडिस्क डिटेक्टच केली नाही तर सॉफ्टवेअर प्रोसेस निरूपयोगी आहे.अश्या वेळेस हार्ड डिस्क खालील सिंप्टम्स दाखवते का ते नोंद करावे
1. हार्ड डिस्क मधे आत प्लॅटर फिरत असल्याचा आवाज येत आहे का ?
2. हा आवाज काही वेळेत बंद होऊन डिस्क फिरण्याची बंद होते आहे का ?
3. फिरण्याच्या वेळेत क्लिकिंग चा आवाज येतो का ?
4. किती क्लिक नंतर हार्डड्राइव फिरायाची बंद होते.
5. PCB चा कुठलाही भाग गरम होतोय का ?
6. हार्ड्ड्राइव computer -> Manage - > Disk Management मधे दिसत आहे का ?
जर दिसत असल्यास ड्राइव दाखवतेय की अन्अलोकेटेड असे दर्शवतेय
7. usb ड्राइव असल्यास लाईट ब्लिंक होतोय का. ?

काही अड्वान्स diagnosis प्रोसेस

तुम्ही हार्डड्राइव च्या डेटा आणि पॉवर केबल जवळ सोनेरी रंगाच्या 4 किंवा अधिक पिन्स बाहेर आलेल्या बघितलीये का ? IDE हार्ड ड्राइव मधे जिथे आपण जंपर सेट्टिंग्स करतो त्या ह्याच पिन्स. SATA ड्राइव मधे पण ह्या पिन्स असतात.

ह्या पिन्स मधे एक पीन Transmitter , एक पीन receiver आणि एक पीन ground असते. ह्या पिन्स व्दारे हार्ड ड्राइव ला प्रोग्रॅम करणे, एरर रिपोर्ट काढणे, हार्ड डिस्क ला फॅक्टरी मोड मधे ऑपरेट करणे शक्य होते. त्या साठी टर्मिनल सॉफ्टवेर ( Hyper Terminal , Putty etc. ) आवश्यक आहे. nokia ची केबल DKU-5 किंवा CA-42 वापरुन USB serial TTL बनवता येते. त्याच्या साहाय्याने टर्मिनल वरील आउटपुट वाचता येते. Segate ची Barracuda 7200.10 मॉडेल ची हार्ड ड्राइव ह्या प्रकारे डायग्नोस करणे सर्वात सोप्पे आहे. अर्थात सगळ्या हार्डड्राइव ना नोकिया केबल चालत नाही.

आता समजा हार्ड ड्राइव डिटेक्ट होत नाहीए पण स्पींनीग व्यवस्थित चालू आहे.. क्लीकिंग पण होत नाहीए . तेव्हा ज्या प्रमाणे टेंपेररी , cache फाइल्स मुळे कंप्यूटर हॅंग होतो त्या प्रमाणे हार्ड डिस्क पण हॅंग होण्याची शक्यता असते. पण फरक येव्हडाच की हार्ड ड्राइव डेटा मुळे हॅंग न होता एरर लिस्ट मुळे होते.
हार्डड्राइव जेव्हा कार्यरत असते तेव्हा एरर असलेल्या सेक्टर चा पत्ता नोंद करून ठेवते, जेणेकरून डेटा एरर सेक्टर वर लिहाला जाउ नये. ही एरर लिस्ट ओवरफ्लो झाली की हार्ड ड्राइव busy मोड ला जाते. मग प्रतिक्रिया करणे बंद करते. टर्मिनल सॉफ्टवेर व USB serial TTL वापरून ही एरर लिस्ट क्लियर केली की ड्राइव परत वर्किंग मधे येते. पण हे करताना चुकून फॅक्टरी सेट्टिंग मधली एरर लिस्ट क्लियर झाली तर हार्ड डिस्क चे कॅलिब्रेशन निघून जाउ शकते.
ज्या प्रमाणे सी ,सी++ मधे कमान्ड्स असतात, त्या प्रमाणे , हार्ड ड्राइव ऑपरेट करण्यासाठी पण कमान्ड्स असतात. ह्या कमान्ड्स हार्ड ड्राइव मॉडेल अँड कंपनी प्रमाणे बदलतात.

काही शंका असल्यास विचाराव्यात अथवा पुढे जावुयात.