डेटा लॉस - अर्थात् हार्ड डिस्क फेल होणे

(मिपा वर माझा पहिला लेख आहे, टाइपिंग मिस्टेक बद्दल क्षमस्व )
महत्वाचा डेटा असलेली हार्ड्ड्राइव बंद पडणे , स्लो रेस्पॉंड करणे किंवा फॉरमॅट होणे एक डोकेदुखी असते.
आंतरजालावर उपलब्ध काही सॉफ्टवेर वापरुन काही डेटा परत आणणे अशक्य नाही ( उदा . R- STUDIO - http://www.r-studio.com )
आणि इतर काही सॉफ्टवेअर्स . हे सर्व सॉफ्टवेअर ड्राइव रेस्पॉंड करत असताना वापरता येतात.

पण हार्ड डिस्क रिस्पोंड करत नसेल तर काही स्पेशल प्रक्रिया वापरुन डेटा पुन्हा प्राप्त करता येतो.

१. जर हार्ड्ड्राइव computer -> Manage - > Disk Management मधे दिसत असेल पण My computer मधे येत नसेल किंवा फॉर्मॅट करा असा संदेश येत असेल तर हार्ड ड्राइव चे फर्मवेयर खराब असण्याची शक्यता आहे.

२. जर हार्ड्ड्राइव computer -> Manage - > Disk Management मधे दिसत नसेल पण कनेक्ट केल्यावर स्पिन होत असेल तर ट्रॅनस्लेटर चा प्रॉब्लेम असु शकतो

३. जर हार्ड्ड्राइव computer -> Manage - > Disk Management मधे दिसत नसेल पण कनेक्ट केल्यावर स्पिनडाउन होत असेल तर, क्लिकिंग चा आवाज होतो का ते बघावे.. जर क्लिकिंग होऊन ड्राइव बंद पडत असेल तर ड्राइव हेड गेले आहेत.

४. जर ड्राइव कनेक्ट केल्यावर PCB गरम होत असेल तर, PCB - IC गेला असण्याची शक्यता असते .

५. जर ड्राइव कनेक्ट केल्यावर PCB गरम होत नाही पण ड्राइव स्पिन पण होत नाहीए तर हेड प्रॉब्लेम किंवा स्पींडल मोटर जाम झाले असु शकते.

आता उपाय, पुढील भागात...