नमस्कार मिपाकरांनो,
सालाबादप्रमाणे यंदाही शतशब्दकथा स्पर्धा आपण आयोजित करतोय. दरवर्षी आपण शतशब्दकथांना विषय देत असतो आणि त्यावर कथा मागवत असतो. यंदा उपक्रमामधे थोडासा बदल करणार आहोत.
ह्या वर्षीच्या स्पर्धेचा विषय आहे "A picture speaks in 100 words" अर्थातचं "छायाचित्राची गोष्टं १०० शब्दांमधे". आवाहनाच्या धाग्यामधे तुम्हाला काही छायाचित्रं दिली जातील त्यापैकी एकावर तुम्हाला १०० शब्दांमधे एक कथा लिहायची आहे. स्पर्धा म्हणली की नियम आणि अटी आलेचं. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत.
०१. एका मिपाकराला कितीही शतशब्दकथा उपक्रमामधे पाठवता येतील पण स्पर्धेसाठी मात्र फक्तं एकचं शतशब्दकथा ग्राह्य धरली जाईल. (जे मिपाकर एकापेक्षा जास्तं कथा पाठवणार आहेत त्यांच्यासाठी कुठली कथा स्पर्धेसाठी आहे हे लिहिणं त्या कथेच्या शिर्षकामधे लिहिणं अनिवार्य आहे.
०२. स्पर्धेमधल्या शतशब्दकथेमधे व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन वगैरेंच्या मुद्रितशोधनाची जबाबदारी संपुर्णपणे स्पर्धकाची असेल.
०३. शतशब्दकथा स्पर्था पाठवायची कालमर्यादा २५ जानेवारी २०१७ ते २० फेब्रुवारी २०१७ अशी असेल. ह्यानंतर आलेल्या कथांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.
०४. कथा 'साहित्य संपादक' ह्या आयडीला व्यनि करायची आहे. कुठल्याही साहित्य संपादकांच्या वैयक्तिक मिपाखात्यावर कथा पाठवु नयेत हि विनंती.
स्पर्धेविषयी काही मदत हवी असल्यास कॅप्टन जॅक स्पॅरो, आदूबाळ, स्रुजा, स्नेहांकिता, वेल्लाभट ह्यांच्याशी संपर्क साधावा.
-------------------
काही नियम टाकावेत असं मला वाटतं. चर्चेअंती आपण ठरवु.
-------------------
१. जातीधर्माला दुखवणारं अथवा अश्लिल लेखन नको.
२. प्रताधिकारमुक्तं छायाचित्रं.
३. लेखकांना स्वताहुन एखादं छायाचित्रं निवडुन त्यावर लिखाण करायचं स्वातंत्र्य द्यायचं का? जेणेकरुन जास्तं एंट्रीज येतील?
_____________________________________________________
@नीलकांत @प्रशांत
____________________________________________________
स्पर्धेचं वोटिंग यंदापासुन आयपी बाइंड करुयात का? द्रुपाल बाळामधे वोटिंगची सुविधा आहे का? नसल्यास आपण
ह्या वेबसाईटवर एक पोल तयार करुन सगळ्या आलेल्या कथांची नावं टाकु शकतोय. पोलची स्टार्ट डेट-एंड डेट टाकु शकतोय. एका आयपी वरुन किती मतं नोंदवता यावीत हे सेट करु शकतोय. त्यामुळे एकचं आयपी शेअर करणार्या लोकांच्या नकळत त्यांना एकापेक्षा जास्तं आणि तीन किंवा तीनपेक्षा कमी अशी मर्यादा आपण येथे सेट करु शकतोय.
@प्रशांत,
एका आयपीवरुन जास्तीत जास्तं किती आयडी लॉगीन होतात ह्याचा काही विदा आहे का? जेणेकरुन एका आयपी वर किती वोट लिमिट टाकायची ते आपण ठरवु शकु.