*/
पहिल्यांदा पिरा ने जेव्हा निपुणची मुलाखत घ्यायची आहे असं सांगितलं तेव्हा थोडं टेन्शन आलं होतं आणि एवढ्या मोठ्या कलाकाराची मुलाखत घेता येईल याचा आनंद होता. टेन्शन याच्यासाठी की या आधी मास कॉम करताना प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या होत्या, पण अशी व्हिडिओ मुलाखत घेण्याचा काहीच अनुभव नव्हता.
शेवटी मुलाखतीचा दिवस उजाडला, (त्याच्या आधीचे किस्से म्हणजे एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहेत ते परत कधीतरी ). मुलाखतीची तयारी करताना निपुण बद्दल भरपूर वाचल्या गेलं, कास्टिंग काऊचचे एपिसोड पुन्हा पुन्हा पाहिले. त्यामुळे मुलाखतीसाठी भरपूर मदतच झाली.
संगीत नाटक करतो म्हणजे हा माणूस अगदी गंभीर वगैरे असेल असं मला वाटलं, पण निपुण गप्पा मारायला मस्तच आहे. कट्ट्यावरच्या मित्राशी बोलताना आपण जेवढ्या सहजतेने बोलतो तेवढ्या सहजपणे तो बोलतो. आपण मोठे दिग्दर्शक-नट आहोत हा बडेजावपण बिलकुल नाही. नाटक म्हणजे त्याचा अगदी जीव की प्राण. डेबिट- क्रेडिट कडून नाटकाकडे झालेला प्रवास सांगताना तो भावुक होतो पण तसं जाणवू देत नाही.
कॅमेरा : गौरव
मुलाखतकार : मंदार भालेराव