आपला आवाज आपली ओळख - (कांचन कराई)

*/

ही चित्रफीत अनेक कारणांसाठी आम्हाला ह्या उपक्रमात आयोजक म्हणून स्पेशल आहे. एक तर ह्या क्षेत्राबद्दल अधिकाराने लिहिणारे कमीच. त्यामुळे एका वेगळ्या विषयावर चित्रफीत मिळणं आवश्यक होतंच. पण त्यांहूनही महत्त्वाचं म्हणजे कांचनताईंच्या जबड्यावर चालू असलेल्या शस्त्रक्रिया. इतक्या त्रासातही त्यांनी ही चित्रफीत बनवली. विशेष म्हणजे हे त्यांच्या आवाजात क्षणभरही जाणवत नाही.

मिपासाठी असलेलं त्यांचं प्रेम, त्यांच्या या व्हिडीओ मध्ये आहे. मोगरा फुलला या नावाने त्या मिपाच्या सदस्या आहेत, आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो !

अनेक सीडीज, ऑडिओ बुक्स, लघुपट, चित्रपट, जाहिराती ह्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषांमध्ये आपला आवाज देणार्‍या कांचनताईंची ही चित्रफीत, "गोष्ट..." चा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे.

-विशेषांक टीम-