*/
Cowards die many times before their deaths…
All the world's a stage, and all the men & women merely players...
To be, or not to be : that is the question…
What’s done is done...
you too Brutus??.....
जगभरातल्या अगणीत नाट्यगृहात, शंभरेक निरनिराळ्या भाषांमधून आणि अनेक दिग्गज अभिनेत्यांनी रंगमंचावर साकारलेल्या या ओळी….
जागतिक नाट्स्ृष्टीमधले एक जबरदस्त नाव - विलियम शेक्सपीयर! शेक्स्पीयरच्या नाटकांमधली ही अजरामर वाक्ये चारशे, साडे चारशे वर्षांपूर्वी लंडन शहरातल्या एका नाट्यगृहात सर्वप्रथम उच्चारल्या गेली. ही महानाट्ये त्या रंगमंचावर पहिल्यांदा जनतेसमोर सादर करण्यात आली. या नाट्यगृहाचे नाव होते ' ग्लोब थियेटर'.
गोष्ट तशी छोटी...या उपक्रमाची दोन तीन महिन्यांपुर्वी घोषणा करण्यात आली होती. दृक श्राव्य माध्यामाला समर्पित असलेल्या लेखमालीकेत शेकस्पीयरच्या या कर्मभूमीवर, त्याच्या लाडक्या ग्लोब थियेटर वर माहीतीपट असावाच अशी कल्पना 'गोष्ट तशी छोटी'च्या टीमने मान्डली.
अनेक चढ उतार बघितलेले, बान्धणी- पुनर्बांधणी मधून तावुन, सुलाखुन निघालेले आणि साडे चारशे वर्षांचा इतिहास सांगणारे ग्लोब थियेटर लंडनमधे मोठ्या दिमाखात उभे आहे.
आज ग्लोब थियेटर हे नाटकांसाठी तसेच वॉकिंग टूर्स साठी जनतेसाठी खुले असते. तिथे असलेले गाइड्स थियेटरची आणि त्याच्या इतिहासाची अगदी उत्तम माहीती देतात.
याच माहीतीच्या आधाराने आणि टूर घेतांना काढलेल्या काही फोटोंच्या सहाय्याने हा माहीतीपट बनवला आहे.
विलियम शेक्सपीयर या महानायकाला आणि त्याच्या लाडक्या ग्लोब थियेटरला मानवंदना देण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न.....