*/
अर्चना जोगळेकर! मराठी चित्रपट सृष्टीतलं आणि कथ्थकच्या जगतातलं एक वलयांकित नाव.
त्या गेले अनेक वर्ष न्यू जर्सी मध्ये राहत असून, "अर्चना नृत्यालय" चालवत आहेत.
त्या हो म्हणतील असं खरं तर वाटलंच नव्हतं. एवढी मोठी व्यक्ती आपल्या लहानशा उपक्रमाला कशाला वेळ देईल असंही वाटलं. पण प्रत्यक्षात मात्र त्या अत्यंत गोड आहेत! अर्थात आम्ही मुलाखत घेताना प्रचंड घाबरलेलो होतोच! पण त्या अगदी भरभरून बोलल्या.
आमच्या सोबत माझं पिलूही सोबत होतं. तिला "गप्प बसून राहा" ही गयावया करून केलेली विनंती सुद्धा तिच्यासाठी खूप धक्कादायक होती. तिने ५ व्या मिनिटाला किरकिर सुरू केली. ३ वेळा मुलाखत थांबवावी लागली. आम्हीच खूप टेन्शनमध्ये आलो पण अर्चना अगदी शांत होत्या. आणि अगदी सहजतेने पुन्हा सुरुवात करत होत्या.
कॅमेरा, अँगल, फ्रेम..सगळं सेट करण्यापासून ते पिलूला चॉकोलेट आणि फुगा देईपर्यंत... प्रत्येक क्षणी आम्ही थक्क होत होतो इतक्या त्या साध्या आहेत. आपला "स्टारडम" कुठेही त्या जाणवू देत नाहीत.
ही मुलाखत घेणं हा खूप छान अनुभव होता.
अर्चना ह्यांचे मनापासून आभार!
कॅमेरावरः रोशनी
मुलाखतकारः पिलीयन रायडर