*/
अॅरि फिल्म्सचे हे एक ड्रीम प्रोजेक्ट होते. आपल्या 'गोष्ट तशी छोटी'साठी ही फिल्म त्यांनी आपल्या डेडलाइनमध्ये बनवली, जेणेकरून ती पहिल्यांदा ह्या व्यासपीठावर प्रदर्शित व्हावी. तेवढ्याकरिता खास धर्मावरमला दोन दिवस मुक्काम ठोकून ही फिल्म चित्रित केली गेली. तेलगू मित्रमैत्रिणींची मदत घेऊन .. रात्री उशिरापर्यंत जागून युद्धपातळीवर भाषांतर झाले. फिल्मच्या एडिटिंगसारखा किचकट भागही वेगाने पूर्ण केला गेला.
खास ह्या उपक्रमाकरिता एवढे कष्ट घेऊन तयार केलेली ही फिल्म, मिपावर पहिल्यांदा प्रदर्शित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
ही फिल्म एकहाती बनवणार्या अॅरि फिल्म्सच्या संचालिका शिल्पा धेंडे ह्यांचे मिपाच्या वतीने हार्दिक आभार!
राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या कलाकारांनी सादर केलेली चित्रकथी हा मिपाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण फिल्म असेल, हे नक्की!