रंगावली प्रदर्शन - २०१२, ठाणे !!
यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात कला-छंदने गेल्या पंचवीस (१९९२-२००१६) वर्षात रांगोळीच्या माध्यमातून घेतलेया उपक्रमांचा धावता आढावा घेतला. मंडळातर्फे दरवर्षी वेगवेगळे विषय हाताळत दिवाळी दरम्यान रांगोळी प्रदर्शन भरवले जाते. गेल्या पंचवीस वर्षात जवळपास पाऊणशे कलाकार या मंडळाने घडवले. सध्या फक्त २५ कलाकार गेल्या १२ वर्षांपासून नियमितपणे या प्रदर्शानासाठी रांगोळी काढायला येतात. प्रदर्शनात रांगोळी काढण्यासाठी जवळपास चार ते पाच दिवस लागतात आणि इथले कलाकार घरचे, कार्यालयातले व्याप सांभाळून अगदी आनंदाने हे करण्यासाठी येतात.
कला-छंद रांगोळीकार मंडळ, ठाणे!
प्रदर्शनाची सुरूवात श्रीगणेशाच्या सुरेख रांगोळीने.
'संत वाङ्मय' या विषयावर काढलेली ज्ञानोबा-तुकारामाची रांगोळी.
'महाराष्ट्राची संस्कृती' या विषयावर काढलेली पंढरीच्या वारीची सुरेख रांगोळी.
या रांगोळीत म्हातार्या वारकर्याच्या चेहर्यावरील बारकावे अगदी दाद देण्याजोगे.
अमित सावंत या कलाकाराने 'स्क्लप्चर्स' या विषयांतर्गत बुद्धाच्या मूर्तीची काढलेली रांगोळी.
प्रदर्शनात मला अतिशय आवडलेली ही रांगोळी. 'शिवराज्याभिषेक' या विषयावर काढलेली प्रचंड सुंदर रांगोळी.
रायगडावर होळीच्या माळावर असलेल्या छत्रपतीच्या पुतळ्याचे हे हुबेहूब चित्र होते. निव्वळ अप्रतिम !!
दरवर्षीच्या प्रदर्शनात ही एक रांगोळी ठरलेली असतेच. या रांगोळीचे विशेष म्हणजे मंडळात कलाकारांच्या हाताखाली लागेल ते काम करणार्या मदतनीसाने मदत करता करता ही कला आत्मसात करत स्वकर्तूत्वावर मदर तेरेसा यांची ही रांगोळी काढली.
'स्त्री भ्रुण हत्या' हा विषय डोळ्यासमोर ठेवून सध्या या मंडळाचे सर्वेसर्वा असलेल्या श्री. उमेश सुतार यांनी रांगोळी चितारली.
'समाजकारण'
बाळासाहेबांच्या मार्मिकमधल्या व्यंगचित्रांनी काही काळ मराठी वाचकांच्या मनावर गारूड केलं होतं.
बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो !!
सद्यस्थितीत भारत-पाक सीमेवर असणारा वाढता तणाव, पाकचे घुसखोरीचे प्रयत्न आणि आपल्या शूरवीर जवानांनी त्यांना दिलेले सडेतोड प्रत्यूत्तर. कला छंद मंडळाची शहीदांना ही आगळीवेगळी आदरांजली !!
काळानुरूप भारतीय क्रिकेटच्या नेतृत्वात झालेले बदल
'शास्त्रज्ञ' या विषयवार काढलेली भारताच्या पूर्व राष्ट्रपतींची रांगोळी.
भारतीय शास्त्र संगीताच्या परंपरेत सितार हे एक मानाचं वाद्य आणि सितारीचा विषय असल्यावर आपोआप पंडीत रविशंकर हे नाव रसिकांच्या डोळ्यासमोर येतं.
त्या विषयाला वाहीलेली ही आणखी एक रांगोळी
सैराटची जादू इथेही पाहायला मिळाली नसती तर नवलच होतं.
'कृष्णधवल' विषय
नल-दमयंती रांगोळी, तैलचित्र या विषयांतर्गत.
कट्यारचे पंडीतजी
नाटकाच्या रंगमंचावरून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणार्या या दोन्ही अभिनेत्यांसाठी कला-छंदने 'नाट्य परंपरा' हा विषय निवडला होता.
लहानपण देगा देवा. यात लहान बाळांच्या चेहर्यावरून ओघळणार्या पाण्याचा इफेक्ट जबरदस्त दिसत होता.
चित्रपट 'बाजीराव-मस्तानी' होता, पण इथे मात्र त्यांनी मस्तानीऐवजी काशीबाईलाच चितारलं, अर्थात काशीबाईच्या भूमिकेतली प्रियांकाही तेवढीच छान दिसत होती. :)
नानाने रंगवलेला नटसम्राटही अगदी तितक्याच ताकदीचा होता जितक्या ताकदीने श्रीराम लागूंनी साकारला होता.