मिपाचं ट्विटर हँडल

नमस्कार संपादक, साहित्य संपादक मंडळी

मिपाचं फेसबुक पेज मिपावर वाचकवर्ग किंवा सदस्यवर्ग वाढवायला मदत करतंय. पण मिपाचा ट्विटरवर प्रेझेन्स नाही. ट्विटरचा रीचही भरपूर आहे शिवाय त्यात पेज लाईक करणे इत्यादी गोष्टींचं बंधन नाही. एक्स्पोनेन्शियली एखादी पोस्ट, ट्वीट अनेकानेक लोकांपर्यंत पोचत राहतं. म्हणून कल्पना मनात आली की मिपाचं ट्विटर हँडल असायला हवं.

याबद्दल सर्वांचे काय विचार आहेत?

मिपाचा जीमेल अकाउंटही आहे. तो वापरून ट्विटर हँडल सुरू करता येईल. विशेष मोठी प्रक्रिया नाही.

धन्यवाद.
वेल्लाभट