जर्मनी मधल्या मोठ्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक म्हणजे विल्हेल्मा!
स्टुटगार्ट मध्ये मध्यवर्ती भागात मोठ्या आकाराचे हे प्राणिसंग्रहालय आहे. पिंजऱ्यातले प्राणी पाहणे हा तितका चांगला अनुभव वाटत नसल्याने कधीच इथे गेलो नव्हतो पण शेवटी काहीच न करण्यापेक्षा निदान वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघून तरी येऊ या विचारांती इथे जाणे झाले.
इथे मुख्यत्वे मी वेगवेगळ्या प्राण्यांचे 15-16 फोटो टाकणार आहे त्यामुळे डेटा वाचवायचा असेल तर बघा! :)
पक्ष्यांचा वेगळा धागा करेन...
1. प्रवेशद्वार
31 ऑक्टोबर ला हॉलोवीन सेलिब्रेशन असणार आहे असा बोर्ड होता! आत थोडीफार तयारीही दिसत होती.
2.
इथून पुढे मग वेगवेगळ्या दिशांना जाणारे अनेक रस्ते होते. पक्ष्यांचा विभाग, फुलपाखरांचा विभाग, मत्स्यालय तसेच एप आणि अन्य प्राण्यांचे स्वतंत्र विभाग अशी ढोबळ विभागणी होती. स्वच्छता आणि टापटीप नेहमीप्रमाणेच उत्तम होती.
चला मग आता काही माकडांचे प्रकार बघूया...
3. emperor tamarins - मिशीवाला छोटू
4. Goeldi's marmoset - गोंडस बाळ
5. pygmy marmosets - हे तळहातावर मावतील एव्हडेच होते!
6. स्लॉथ - अतिमंद प्राणी!
7. gold-headed lion tamarins - आकाराने लहान असला तरी याला सिंहासारखी आयाळ असते!
8. Forest Baboon - यांच्याकडे पाहून मला अचानक 'तेरे खुशबू मी बसे खत' हि गझल आठवली! ;)
9. white-handed gibbons - आई तुझा आशीर्वाद...
10. white-handed gibbons - याच्याकडे पाहून थोडे वाईट वाटले
11. Spider monkey - याची खासियत काय हे शोधात असाल तर एकदा शेपटी पहा साहेबांची! सगळ्यात ताकदवान शेपूट या माकडांची असते...
12. Spider monkey - जवळून
13. gelada baboons - (bleeding heart monkeys ) यांची छाती लाल असते म्हणून असे नाव!
14. red-faced macaques - (Snow Monkeys ) यांचे मूळ स्थान जपान! बर्फाच्छादित भागात राहणे पसंद करत असल्याने असे नाव...
15. अजून एक
16. गोरिला :
17. अजून एक
बरेच फोटो झाले. पेज लोड व्हायला खूप वेळ लागू नये म्हणून इथेच थांबतो...
काही प्राणी आणि उर्वरित पक्षी दुसऱ्या धाग्यामध्ये...