सपरीवर झुलत रायते एकटी बंगळी बही
झुल्वत जात होते तिले हात थे थांबले कई?
माह्या बी घराले कुलूप लागला गाव सामसूम
चिमन्या बी मयालीत आता बसून रायल्या नही
जीवच काडते गा असे सोंग झाले सनाइचे
डीजे वाजते, कापते भीत थरथर तई तई
दोस्तीची जुनी येल सुकते असी लागते नजर
का होते? जडीसीन कोनी कसा टाकते मही?
मारा एक चक्कर घराची तुमी फुरसतीत जी
गझलेतून पूरी कथा येल का आमची कई?
- संकेत
---------------------------
.

.
शब्दार्थ:
सपरी:- ओसरी
बंगळी:- लाकडी झोपाळा
बही:- वेडी
मयाल:- तुळई, बीम
सनाईचे:- सणांचे
येल:- वेल
जडीसीन:- मुळाशी
मही:- ताक
भीत :- भिंत
(छायाचित्र: पिलीयन रायडर)