लाखो करोडो प्रजातींमध्ये नखभर उंचीची, कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची क स ली ही शारीरिक कुवत नसलेली एक जमात जेव्हा आपलं नगण्य अस्तित्व घेऊन आली, तेव्हा खरं म्हणजे इतर प्राणी तुच्छतेने हसले असतील. अनेक कीटकांपैकी एक.. आत्ता आहे उद्या नसेल असा जेमतेम छटाकभर देह कुणाच्या खिजगणतीतही नसेल. पण कुणालाही न लाभलेलं एक वरदान या प्रजातीला लाभलं होतं - कुतूहल!!
अनेक दिग्गज या विश्वात आले, तसे एका कुठल्यातरी प्रलयाला बळी पडून विलयालाही गेले. पण ही जमात आल्यापासून या ना त्या रूपात आपलं अस्तित्व केवळ कुतूहलापायी टिकवून आहे. कुतूहलाचं कोलीत हातात मिळालेल्या या प्राण्याला नस्त्या उचापती फार!! इथे या भूतलावर उगवल्यापासून आपण काय दिवे लावले, कसे टिकून राहिलो, इतर प्राणी कसे गेले बाराच्या भावात ते आपण अगदी रंगवून रंगवून सांगायला लागलो. आपल्याला समजलेल्या सगळ्या चाराण्याच्या गोष्टींना बाराण्याचा मसाला लावून ते दुसर्याला रंगवून रंगवून सांगण्यातली मज्जाच काही वेगळी!
आधी धड बोलता येत नव्हतं, लिहिणं तर फारच दूर. तेव्हाही आमच्या पूर्वजांनी गुहांमध्ये चित्रं काढू काढू गोष्टीवेल्हाळपणा केलाय. कधीतरी मग स्वतःला साक्षर(!) करून घेतलं आणि मग काय सांगू नि काय नको असं झालं. तिकडे ते इलियड-ओडेसी, इकडे रामायण-महाभारत, झालंच तर तो इराकमधला गिल्गमेश..
तर या 'गोष्ट सांगा-गोष्ट ऐका-गोष्ट लिहा-गोष्ट वाचा' मोहिमेअंतर्गत आपलं छाsssन चालू होतं अगदी! पण स्वतःला साक्षर करण्याच्या नादात, लिपी नावाची एक गुंतागुंत अस्तित्वात आली होती. गोष्ट वाचायची असेल तर आधी ही भानगड समजणं भाग होतं. चित्रांचं मात्र तसं नव्हतं. अडाण्यांनासुद्धा ती कळत होती. त्यातली गोष्ट समजत होती. लागलीच आपण चित्रांचा भाव वाढवुन घेतला. एका चित्रातून हजार शब्दांची गोष्ट उलगडू लागली.
पण थोडक्यात समाधान झालं तर आपल्याला हत्ती, माकड, गाढव वगैरे नाव नसतं का पडलं? आपलं नाव माणूस.. म्हणजे कशातही समाधान नको मानूस ;) ही आपली लाडकी गोष्ट नुसती दिसायला नाही तर बोलायला - हलायला हवी, असं आपल्याला फार वाटू लागलं. आपण जे जे काय वेडेचाळे करतो आणि जे काही करायची आपली बापजन्मात ताकद नाही, त्या करामतीही तिने कराव्यात असं आपल्या मनाने घेतलं. मग काय विचारता??!!
ती माणसाच्या अस्तित्वाइतकी टिचभर छोटीशी गोष्ट त्याच्या कल्पनेपेक्षा मोठी झाली.
तिच्यासाठी उभा राहिला रंगमंच!!
कलाकार आले.. वाजंत्री आली.. रंगरंगोटीला चित्रकार आले.. लखलख चंदेरी प्रकाशात गोष्ट उजळून गेली आणि "सांगायची गोष्ट" खास "अनुभवायची" बाब झाली.
कधी कठपुतळी कधी दशावतार,क धी नृत्यनाटिका, कधी संगीत नाटकं....तिच्या अविष्काराला कलाप्रकाराचं बंधन राहिलं नाही. एकीकडे कुतुहलाच्या पोटी तंत्रज्ञान नावाचं अत्रंगी कार्टं जन्माला आलं होतं. त्याने या गोष्टीला छोट्याशा बॉक्स मधुन जगभर पोहोचवलं. माणसाच्या मागचे व्याप वाढले, गोष्ट पण तशी आता शहाणी सुरती झाली - काळाबरोबर ७२ इंची पडद्यावर ती उतरली होतीच, आता ती वेळेची गणितं ओळखुन "शॉर्ट फिल्म्स" मध्ये पण चटकन डोकावुन जायला लागली..
तिच्या या प्रवासात तिच्याबरोबर पटकथा, रंगभूषा, वेषभूषा, पात्रं, कॅमेरा, लाईट्स, नेपथ्य, संगीत असे अनेक खंदे शिलेदार उभे राहिले. या शिलेदारांनी गोष्टीला 'लार्जर दॅन लाइफ' बनवलं. मूळ कथेला विलक्षण उंचीवर नेऊन ठेवलं.
.GeneratedText {
font-family:'Comic Sans MS';font-size:1em;font-weight:bold;letter-spacing:0em;line-height:1.3em;text-align:center;color:#330099;background-color:#FFFFFF;padding:0.75em;
}
याच मानाच्या शिलेदारांची गोष्ट आपल्याला सांगायची आहे!
दशकपूर्ती निमित्त होणार्या उपक्रमांचा शुभारंभ करताना दृकश्राव्य माध्यमातून कशीही, कुठेही, केव्हाही सादर झालेली गोष्ट आणि तिचं रूप बदलणारे पैलू ह्या विषयावर आपण एक लेखमाला + करणार आहोत.
तर या शुभारंभाच्या उपक्रमाचं नाव .. "गोष्ट तशी छोटी..!"
आणि आपल्या या गोष्टीच्या आविष्काराकरिता मिसळपाव सादर करत आहे

.GeneratedMarquee {
font-family:'Comic Sans MS';
font-size:3em;
font-weight:bold;
line-height:1.3em;
color:#660000;
background-color:#FFFFFF;
padding:0.2em;
}
"मिपा यु ट्युब चॅनल"
तुम्हाला आवडलेली गोष्ट, तिची वेगवेगळी रूपं, तिला चढलेला संगीताचा साज, कॅमेर्याच्या नजरेतून दिसणारा तिचा नवाच पैलू, प्रकाशयोजनेने उजळून टाकलेली तिची न उलगडलेली बाजू, तिच्यातलं मनात अजूनही घर करून राहिलेलं पात्र...
विषय अगदी अमर्याद आहेत!!
बुनियाद, हमलोग यासारख्या मालिका असोत किंवा भक्ती बर्वेंनी साकारलेली 'ती फुलराणी' असो, बी.आर चोप्रांचं महाभारत असो वा आजचं गेम ऑफ थ्रोन्स, पुरुषोत्तममध्ये सादर होणारं नाटक असो वा ब्रॉडवेवर होणारा एखादा शो, 'जाणता राजा'चा भव्य सेट असो वा रस्त्यावर सादर होणारं पथनाट्य, कोकणात भेटणारे दशावतार असोत वा आंतरजालावरचं खास प्रदर्शित होणारी वेब सिरीज.. आपल्याला कोणताही विषय वर्ज्य नाही!
पडद्यावर आणि पडद्यामागे गोष्टीला नवं रूप देणार्या क्षेत्रांबद्दल, त्यात काम करणार्या मनस्वी लोकांबद्दल किंवा निर्मिती संस्थांबद्दल देखील तुम्ही लिहू शकता.
ह्या उपक्रमासाठी वरील कोणत्याही विषयावर तुम्ही तुमचा लेख चित्रफितीच्या (व्हिडिओ आर्टिकलच्या) स्वरूपातही आम्हाला देऊ शकता. तुमचा लेख, त्याला साजेशा फोटोंची पार्श्वभूमी देऊन, अभिवाचनाच्या स्वरूपात तुम्ही रेकॉर्ड करु शकता. किंवा तुमच्या विषयाबद्दल एखादी लहानशी फिल्मही बनवू शकता. हे चॅनल सध्या प्रायोगिक तत्त्वावर असल्याने, आम्ही तुम्हाला त्यासाठी सर्व तांत्रिक मदतही करू. त्यासाठी तुम्ही विशेषांक आयडीसोबतच, स्रुजा आणि पिलीयन रायडर ह्यांच्याशीही संपर्क साधू शकता.
नववर्षानिमित्त येणार्या ह्या उपक्रमासाठी आपण लेख अथवा चित्रफिती पाठवायच्या आहेत १० डिसेंबरपर्यंत.
लेख 'विशेषांक' ह्या आयडीला पाठवायचे आहेत. तुमच्या लेखांचे विषय नोंदवण्यासाठी इथे क्लिक करा.
निघालात कुठे? अजून तर कहानीमे ट्विस्ट बाकी है मेरे दोस्त!
दशकपूर्तीचा उपक्रम आणि नुसती लेखमाला? असं कसं होईल हो ! लेखमालेनंतरचा तो + धमाल भाग घेऊन लवकरच परत येऊ!
तोवर आपल्या धमाकेदार दिवाळी अंकाचा आस्वाद घ्या..आणि हो , आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करा, आपापल्या लेखांवर विचार सुरु करा.. स्टे ट्यूनड!

आपलं चॅनलः