अॅपल केक

अ‍ॅपल केक प्रकार २
अॅपल केक प्रकार १ येथे पाहता येईल.

साहित्य :

१०० ग्राम बटर, १५० ग्राम साखर, ३ अंडी, १ चमचा लिंबाचा रस, चिमूटभर मीठ, २०० ग्राम मैदा, १/४ कप दूध,
२ चहाचे चमचे (सपाट/फ्लॅट) बेकिंग पावडर
४-५ मध्यम आकाराची सफरचंदे

कृती :

बटर भरपूर फेटणे, मिक्सी फिरवताना हाताला हलके लागायला लागेल. मग त्यात साखर घालून फेटणे,
अंडी घालून फेटणे. चिमूटभर मीठ व लिंबाचा रस घालणे आणि फेटणे.
मैद्यात बेकिंग पावडर मिक्स करणे. हा मैदा थोडा थोडा घालत फेटणे‌. शेवटी दूध घालून फेटणे.
सफरचंदाच्या साली न काढता अगदी पातळ फोडी करणे.
ज्या भांड्यात केक करायचा असेल, त्याला बटर लावून घेणे व त्यात केकचे मिश्रण एकसारखे पसरणे. त्यावर सफरचंदाच्या फोडी बसवणे.
ओव्हन प्री-हीट करणे. १८० अंश से.वर साधारण २५ ते ३० मिनिटे बेक करणे. आवश्यकता वाटली, तर अर्ध्या तासानंतर तापमान १७० अंशावर आणणे. फोडी पातळ आहेत त्या जळत नाहीत ना, ह्याकडे लक्ष देणे.
बेक करून गार झाला की वरून पिठीसाखर पेरून सुशोभित करणे. कॉफी आणि व्हिप्ड क्रीमबरोबर खाणे.

.

.