पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों ।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥
कोणत्याही शुभकार्याच्या आधी पुजला जातो तो गणपती. तो कोणाच्या घरी दिड, कोणाच्या घरी पाच तर कुठे दहा दिवस तो विराजमान असतो. तो असतांना घरातलं वातावरण अगदी उत्साहाने भारलेलं असतं. अश्या या लाडक्या गणू , गणोबा, गणपतीच्या आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याची कृपा तुमच्यावर सतत राहो हिच बाप्पा चरणी प्रार्थना