बाप्पाचा नैवेद्य - पंचखाद्य लाडू

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
}

पंचखाद्य लाडू.

.
गणपतीसाठी नैवेद्याला दर वर्षी काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा असतोच. म्हणूनच नेहमी वापरात असलेले साहित्य वापरून, तसेच कमी वेळात होणारी पाककृती देत आहे. करून पाहा, आवडेलच. गणपतीला आणि तुम्हालासुद्धा.

साहित्य :-
१. एक कप बिनबियांचा खजूर. (नेहमीचाही बिया काढून वापरू शकता.)
२. एक टेबलस्पून तूप, अर्थातच साजूक.
३. दोन टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट.
४. एक टेबलस्पून खसखस.
५. दोन टेबलस्पून गुळाची पावडर.
६. पाव चहाचा चमचा जायफळ पावडर.
७. बदामाचे काप किंवा एक चहाचा चमचा भरड पूड.

कृती :-
१. गॅसवर कढई तापवून त्यात तूप घालून खजूर मऊ होईपर्यंत परतावा. परतताना मध्ये मध्ये चमच्याने कुस्करावा. हात भराभर चालवावा, नाहीतर खजूर करपण्याची शक्यता असते.
२. खजूर छान एकजीव होतो चारपाच मिनिटात. त्यानंतर गार करण्यासठी एका ताटात पसरून द्यावा.
३. गरम कढईत खसखस आणि खोबरे मंद आचेवर भाजून घेऊन गॅस बंद करून गूळ पावडर मिसळावी.
४. आता हे मिश्रण खजुरावर घालून त्यात जायफळ पावडर आणि बदाम काप घालावे.
५. साधारण कोमट झाल्यवर मळून घ्यावे. हव्या त्या आकाराचे लाडू वळावेत किंवा मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावेत. हवे असल्यास डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवावेत. त्यासाठी अर्धा टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट लागेल.

या मिश्रणाचे पेढ्याच्या आकाराचे २१ लाडू किंवा मोदक पंधरा मिनिटात तयार होतात.

गणपती बाप्पा मोरया.