.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
}
खव्याची पोळी

गोड, खुसखुशीत, तोंडात विरघळणारी खव्याची पोळी चवीला अप्रतिम लागते. करायलाही खूप सोप्पी.
साहित्य :
तांदूळ पीठ किंवा मैदा - आवश्यकतेनुसार लाटण्यासाठी
साजूक तूप- आवश्यकतेनुसार भाजण्यासाठी
पोळीसाठी :
गहू पीठ (कणीक)- १ कप
मैदा- १/२ कप
बारीक रवा- १/४ कप
तेल (मोहन)- १/४ कप
मीठ- १/४ टीस्पून
पाणी - अंदाजे ३/४ कप ते १ कप
सारणासाठी :
खवा- १ कप (२०० ग्रॅम )
खसखस- १ टेबलस्पून
पिठीसाखर - ३/४ कप ते १ कप
जायफळ किंवा वेलची पूड - १ टीस्पून
कणीक- १/४ कप
साजूक तूप- १ टीस्पून
दूध- १ चमचा (जर आवश्यकता वाटली तरच )
कृती :
कणीक, मैदा, रवा व मीठ एकत्र करावे, मग कडकडीत मोहन घालून कणीक दोन तास भिजवून ठेवावी. कणीक नेहमीपेक्षा घट्ट असायला हवी नाहीतर पोळी चिवट होते.
खसखस खमंग भाजून जाडसर कुटून घ्यावी.
पिठीसाखरेतील गुठळ्या मोडून घ्याव्यात.
कणीक १ टीस्पून तुपावर खमंग भाजावी. दुसऱ्या बाउलमध्ये काढून ठेवावी.
खवा मंद आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावा आणि तो खवा कोमट असतानाच गाठी मोडून मळून घ्यावा.
खवा, भाजलेली कणीक, पिठीसाखर, खसखस कूट, वेलची पूड एकत्र करून सारण छान मऊसर मळून घ्यावे. सारण खूप कोरडे वाटल्यास दुधाच्या हाताने मळून घ्यावे. गुठळ्या अजिबात असू नयेत.
सारणाचे लिंबाएवढ्या आकाराचे गोळे करावेत.
कणकेचेसुद्धा लिंबाएवढ्या आकाराचे गोळे करावेत.
हाताला तूप लावून कणकेचा एक गोळा घेऊन त्याचा वाटीसारखा आकार करून त्यात सारणाचा गोळा भरून (पुरण पोळी प्रमाणे) तोंड बंद करावे.
तांदळाच्या पिठावर नेहमीप्रमाणे हलक्या हाताने पोळी लाटावी. खव्याचे सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी.
पोळी मंद ते मध्यम आचेवर तव्यावर गुलाबी रंगावर भाजावी. भाजताना बाजूने थोडे थोडे तूप सोडून भाजावी. अशा प्रकारे सर्व पोळ्या करून घ्याव्यात.
गरमागरम असतानाच दुधासोबत वरून तुपाची धार सोडून खायला द्यावी.
टीप:
तुमच्याकडे खव्याचे पेढे-बर्फी काही उरले असेल तर त्यापासूनही करता येईल. फूड-प्रोसेसर मध्ये पेढे-बर्फी, अगदी थोडेसे दूध आणि चवीप्रमाणे पिठीसाखर टाकून छान मळून घ्या. सारण तयार. बाकी कृती वरील प्रमाणेच.