मी पा सदस्यांची मदत अथवा मत हवे आहे....

नमस्कार मंडळी...
खरे तर खूप कंटाळा आला आहे या नेहेमीच्या रुटीनचा. अस्मादिक स्थापत्य अभियंता असल्याने तरी बरे आहे दरवेळी नवीन आव्हाने येतात अन स्वानंद भेटतो. परंतु आता मात्र वैताग आला आहे . असो.
सध्या अँप ची चलती आहे. आमच्याही मनात असाच एक विचार आहे . सर्व बांधकाम संबंधित सेवा ( छोट्या स्केल वर.,म्हणजे जशी घर टू घर डिलिव्हरी ) एका छत्राखाली आणण्याचा मानस आहे.
मग त्यात प्लम्बिंग, इलेक्टरीफिकेशन, फ्लोरिंग, सुतारकाम , रंगकाम , वॉटर प्रूफिंग , फर्निचर , किरकोळ बांधकाम , छोटे बदल , तोडफोड इ . तसेच इतर सेवा जसे व्हाल्यू एशन, प्लॅनिंग , देखरेख इ . समाविष्ट असेल . अश्या प्रकारचे अँप आहे किंवा नाही माहित नाही परंतु काही गोष्टींसाठी जस्ट डायल वगैरे आहे. पण त्यात सेवा देणाऱ्याचा पत्ता देतात. या अँप मध्ये या सर्व सेवा आम्ही स्वतः देणार . त्या नुसार आमची प्रशिक्षित माणसे ऑर्डर नुसार त्या ठिकाणी जाऊन सेवा देतील.
सध्या तरी पुण्यातच हे अँप चालणार आहे.
तत्पूर्वी आपल्या मी पा सदस्यांची या बाबत मते तसेच सूचना जाणण्यास उत्सुक आहे.