.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
}
नारळीपौर्णिमेनिमित्त घरात बरेच नारळ आलेले असतात. मग सर्वांच्या आवडत्या नारळाच्या वड्या केल्या जातात. भरपूर दूध घालून मऊसूत अशा 'फज'सारख्या वड्या आमच्याकडे खूप आवडतात. नेहमीसाठी वेलदोडा (इलायची) घातलेली असतेच. पण मी कधी बदल म्हणून केशर, जायफळ, आमरस घालूनही बनवते. एकदा एका लग्नात आईने गुलकंद घालून केलेली नारळाच्या वड्या पाहिल्या आणि घरी आल्यावर त्याची फारच स्तुती केली. गुलकंद आणि नारळ हे दोन्ही अगदीच आवडते असल्यामुळे त्या करून पाहायची इच्छा होतीच. तसेच मध्ये एकदा रुह-अफ्जा घालून केलेले नारळाचे लाडू याची पाककृती पाहिली होती. त्या पाककृतीत मिल्कमेड घातलेले होते. मी नेहमीप्रमाणेच दूध घालून केली आणि त्यात गुलकंदही घातले. चव तर छान लागलीच, तसंच दिसायलाही फारच आकर्षक!
साहित्य:
दोन वाट्या नारळाचा चव
दीड वाटी दूध
दीड वाटी साखर (आवडीनुसार कमी/जास्त घेऊ शकता.)
चार टे.स्पून रुह-अफ्जा / रोझ सिरप
दोन टे.स्पून तूप
गुलकंद
कृती:
सजावटीसाठी एक-दोन टे.स्पून नारळाचा चव वेगळा काढून घ्या.
तूप गरम करून त्यात उरलेला नारळाचा चव एक-दोन मिनिटे परतून घ्या.
त्यात दूध घालून मध्यम आचेवर अधूनमधून ढवळत राहा.
दूध आटत आले की साखर घाला.
आणखी थोडा वेळ मिश्रण हलवत राहा.
मिश्रण थोडे घट्ट होत आले की रुह-अफ्जा घालून नीट हलवून घ्या.
सगळ्या मिश्रणाला एकसारखा रंग आला की गॅस बंद करा.
आता या मिश्रणाच्या वड्या/ लाडू/ रोल्स जे आवडेल ते बनवा.
वड्या बनवण्यासाठी मिश्रण ताटात पसरवून वड्या पाडून घ्या.
लाडू:
लाडू बनवण्यासाठी मिश्रण थोडे गार होऊ द्या.
थोडेसे मिश्रण तळहातावर घ्या. छोट्याशा पारीसारखा आकार देऊन एक छोटासा गुलकंदाचा गोळा त्यात भरा. वरून आणखी नारळाचे मिश्रण लावून लाडू वळून घ्या.
असे सगळे लाडू वळून शेवटी वेगळ्या काढलेल्या चवामध्ये घोळवून घ्या.

रोल्स:
एका बटरपेपरवर / अॅल्यु. फॉईलवर साधारण दोन-अडीच इंच रुंदी होईल असे मिश्रण पसरवून एक थर बनवून घ्या.
त्या थरावर रुंदीच्या मधोमध बोटभर रुंदीचा गुलकंदाचा थर द्या.
रोल्स बनल्यावर गुलकंद मध्ये येईल अशा तर्हेने पेपर/ फॉईल एका बाजूने मिश्रणासहित अलगद उचलून दुसर्या बाजूकडे नेऊन हलकासा दाब देऊन बंद करा.
थोडा वेळ तसेच फ्रीजमध्ये ठेवा.
जरा घट्ट झाल्यावर बाहेर काढा. पेपर/ फॉईल पुन्हा अलगद उघडून साधारण बोटभर जाडीचे रोल्स कापा.
मागच्या वर्षीच्या कणकेचा शिरा या बाप्पाच्या नैवेद्यात "प्रशाद को दात नही लगाते" वाचले होते. हे रोल्स असेच जिभेवर ठेवले की विरघळतात.
