बाप्पाचा नैवेद्यः बर्लिनर डोनट्स

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
}

ह्या वर्षी बाप्पाच्या प्रसादाला काहीतरी वेगळे करावे असे मनात आले. (बाप्पाने तरी काय दर वर्षी तेच तेच खायचे? त्याला काही व्हरायटी हवी की नको?)
म्हणून मग बर्लिनर डोनटस करायचे ठरले, त्याची एकदम बर्लिनची, आकिम आजोबांच्या आईची पाकृ तुम्हाला माहीत करून दिली आहेच. त्यात काही फेरफार करून, ते त्सेंटाआजीकडून अ‍ॅप्रूव्ह करून घेतले आणि प्रसादायोग्य डोनटस तयार झाले.

साहित्य-
अडीच वाट्या मैदा, १ वाटी भरून साखर, ५ टेबलस्पून बटर, पाऊण ते १ कप कोमट दूध, १ चिमूट मीठ, तळणीसाठी तेल
२ वाट्या पिठीसाखर गार्निशिंगसाठी.
२ क्यूब्ज फ्रेश यीस्ट किवा २ पाकिटे ड्राय यीस्ट
(फ्रेश यीस्टचा ४० ते ४२ ग्रॅमचा क्यूब आमच्याकडे मिळतो. ड्राय यीस्ट घेतले तर छोट्या सॅशेमध्ये येतात.)
प्लम, चेरी, अ‍ॅप्रिकॉट किंवा कोणताही आवडीचा जॅम (४५० ते ५०० ग्रॅमची बाटली.)
पेस्ट्री बॅग, २-३ स्वच्छ फडकी, २-३ मोठे ट्रे किवा ताटे, १ वाटी

कृती -
कोमट दुधात साखर घाला. त्यात यीस्ट घालून रवीने घुसळा. मिश्रण एकजीव झाले पाहिजे.
मैद्यात चिमूटभर मीठ घाला व त्यावर हे मिश्रण ओता. एखादे फडके घालून झाकून उबेशी १५ ते २० मिनिटे ठेवा. बटर पातळ करून ते ह्या मिश्रणावर घाला आणि पोळीच्या कणकेपेक्षा थोडे सैल ठेवा. भरपूर मळावे लागते. गोळा परातीत दोन-चारदा आपटा. (कोणावरचा राग काढायचा असला, तर त्या गोळ्यावर काढा,:) ) मऊसर गोळा झाला पाहिजे. हा गोळा परत फडक्याने झाकून उबेशी १५-२० मिनिटे ठेवा.

पोळपाटावर किवा प्लॅटफॉर्मवर मैदा भुरभुरून घ्या. लाटण्यालाही मैदा चोळून घ्या. मिश्रण फरमेंट होऊन, हलके होऊन जवळपास दुप्पट फुगले की त्यातील एक मोठा गोळा काढून घ्या आणि बाकीचे मिश्रण झाकून उबेशीच ठेवा. हा गोळा परत एकदा पोळपाटावर आपटून जाडसर पोळी लाटा. वाटीने त्याचे गोल आकार कापून घ्या व ते एका ताटात अंतराअंतरावर ठेवून ते ताट फडक्याने झाकून उबेशी ठेवा. दुसरी पोळी लाटा व वाटीने डोनट्स कापा.

एकीकडे तेल तापत ठेवा व एका ताटलीत वाटीभर पिठीसाखर घालून ठेवा. पेस्ट्री बॅगेत जॅम भरून त्यावर लहान टिप बसवा. तेल तापले की मध्यम आचेवर हे डोनट्स तळा. गोल्डन ब्राउन झाले की टिश्यू पेपरवर घाला व गरम असतानाच, लगेच पिठीसाखरेत घोळवा. पेस्ट्री बॅगेची टिप त्यात घुसवून जॅम भरा.

डोनट गरम असतानाच जॅम आत भरला जातो व पिठीसाखरही त्यावर नीट बसते. त्यामुळे ही स्टेप वेळेत करणे महत्त्वाचे आहे.

असे सर्व डोनटस करून पेपरवर पसरून ठेवा. गार झाले की एखाद्या फ्लॅट डब्यात भरून ठेवा.
बाप्पाला नेवैद्य दाखवा आणि आता काय बघता? खा!

1