क्रिडाजगतातील कुंभमेळा... रिओ ऑलिंपिक..आणि घडामोडी ..

आजपासून रिओ ऑलिम्पिक २०१६ ची दमदार सुरूवात होणार असून क्रीडा ज्योत महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते प्रज्वलित होईल अन् आकाश उजळून सोडणाऱ्या आतशबाजीने खेळाडूंच्या स्पर्धेला प्रारंभ होईल. या ऑलिम्पिक महाकुंभाची ओपनिंग सेरमनी रिओतील माराकाना स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंकडून साऱ्यांनाच अपेक्षा आहेत.
शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरू होत असलेल्या ३१व्या ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अधिकाधिक पदकांच्या अपेक्षा सव्वाशे कोटी भारतीय बाळगून आहेत. लंडनच्या सहा पदकांच्या तुलनेत यंदा दुप्पट पदके भारताला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पदकांची संख्या दुप्पट करण्याच्या प्रयत्नात भारतीय पथकातील ११८ खेळाडू निश्चितच असतील. धावपटू धरमवीर आणि गोळाफेकपटू इंदरजितसिंग हे डोपिंगमध्ये अपयशी ठरल्याने त्यांना भारतातच थांबण्यास सांगण्यात आले आहे. याआधी नरसिंगदेखील डोपिंगमध्ये अपयशी ठरला होता; पण नाडाच्या सुनावणीत तो सहीसलामत बाहेर पडल्यामुळे आणि विश्व कुस्ती महासंघाने परवानगी बहाल केल्याने नरसिंग येथे पोहोचण्याची शक्यता आहे.
तर आज आर्चरी (तिरंदाजी) स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती आहे. आज या खेळाचा पहिलाच रॅंकिंग राऊड असणार आहे. पुरूष ग्रुपची स्पर्धा आज सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. त्यानंतर पुरूष एकल स्पर्धाही ५.३० वाजता होणार आहे. तर महिला ग्रुप आणि महिला एकलही आज रात्री ९.३० वाजता पार पडणार आहे. तर भारताकडून यावेळी ऑलंपिक खेळासाठी दीपिका कुमारी, अनातु दास, लक्ष्मीराणी मांझी, बॉम्बायला देवी राईश्राम यांची निवड झाली आहे. दीपिकाकडून देशाला मेडल मिळण्याच्या अपेक्षा केल्या जात आहेत.

ऑलिंपिक संबंधित सर्व बातम्या,निकाल,विक्रम मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी आणि देण्यासाठी सर्वानी मदत करावी।