मिपाच्या IT support तज्ञांची मदत हवी आहे..

windows 10 मधे एका user चे desktop icons गायब झालेत. Desktop वर right click पण होत नाही.
एका Windows Update मुळे सगळ्याच युझर चे Icons गायब झाले होते. तेव्हा तो perticular windows update (KB3159398) uninstall केल्या नंतर Icons परत आले. पण तेही फक्त windows 7 आणि 8 मधेच.
या windows १० मधे तो Update नहिच्चे, त्यामुळे uninstall करण्याचा प्रश्न नाही. System Restore करायचं म्हटलं तर २ दिवसांपुर्वी फक्त Adobe Acrobat update केलं होतं. त्याने काही फरक पडेल असं वाटत नाही.
Event Log मधे १५० च्या वर events आहेत. आणि त्यातही नेमकं कशामुळे असं झालंय ते कळेना. Google बाबा कडुनही काही उत्तर मिळेना. म्हणून हा लेखन प्रपंच.
जाणकारांनी कृपया मदत करावी.

- ITतली बिचारी.