नमस्कार!
हा धागा दिवाळी अंकाचं स्वरूप काय असावं या चर्चेसाठी नाही. त्यासाठी वेगळा धागा येत्या काही दिवसांत काढतो.
दिवाळी ३० ऑक्टोबर २०१६ला सुरू होते आहे. त्या दिवशी अंक प्रकाशित करायचा असं धरून खाली दिलेला प्लॅन बनवला आहे.
हा धागा खालील गोष्टींसाठी आहे:
१. हा प्लॅन बरोबर वाटतो आहे का याबाबत सर्वांची मतं घेणं.
२. पूर्वीच्या दिअं संपादकांकडून मार्गदर्शन घेणं.
३. दिअंसाठी लागणार्या वेगवेगळ्या चमूंची यादी खाली देत आहे. तुम्हाला कोणत्या चमूंत (अनेकवचन!) सहभागी व्हायला आवडेल त्याच्याबद्दल विचार करून ठेवणं.
तर प्लॅनबाबतः
- प्लॅनमध्ये "ठमिससा" असे चार टप्पे असतील (ठरवणे, मिळवणे, सजवणे, सादर करणे)
- प्रत्येक टप्प्याच्या शेवटी एक "टोलनाका" असेल. म्हणजे सगळं शिस्तीने चाललंय ना, काय मागे आहे, काय पुढे आहे, कोणाला ढोसायला पाहिजे, इ. याचा आढावा घेणे, आणि ठोस कृती करणे
- शेवटचा टोलनाका म्हणजे अर्थातच प्रकाशन.
--------------------------
टप्पा १: (आराखडा) ठरवणे
१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१६
म्हणजे आपण आत्ता जे करतो आहे ते ;) यामध्ये खालील गोष्टी येतीलः
१. या प्लॅनवर चर्चा करून निर्णय घेणे
२. चावडीमध्ये चर्चा करून अंकाचा आराखडा ठरवणे
२अ. कोणी निमंत्रित लेखक असल्यास त्यांचे हँडलर ठरवणे
३. चमूंमध्ये सहभागी होणार्यांची यादी
४. चमूंच्या नेत्यांचा एक आणि चमूंचा प्रत्येकी एक असे व्हॉट्सअॅप ग्रुप काढणे
टोलनाका: मुख्य बोर्डावर धागा काढणे
टप्पा २: (लेखन) मिळवणे
१५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०१६
वर १५ ऑक्टोबर लिहिलेलं असलं तरी ते आपल्याआपल्यात आहे. जगासाठी डेडलाईन १ ऑक्टोबर ठेवावी. पुढचे १५ दिवस मानाच्या गणपतींसाठी ठेवले आहेत. ;)
मिपाकरांकडून आलेलं लेखनः
१. या चावडीत प्रकाशित करणे (जसं आलं आहे तसं - काहीही बदल न करता)
२. स्वीकारावं की नाकारावं याबद्दल मतदान / चर्चा करणे
३. स्वीकारावं असा निर्णय झाल्यास सजावट चमूकडे पाठवणे
४. नाकारावं असा निर्णय झाल्यास लेखकाला कळवणे
आमंत्रित लेखनः
१. हँडलर चमूने दर १५ दिवसांनी उप्दते देणे
२. लेखन आल्यावर चावडीत प्रकाशित करणे
टोलनाका: दिअंमधल्या लेखनाची यादी. यानंतर लेखन स्वीकारलं जाणार नाही. निमंत्रितांचं असलं तरीही.
टप्पा ३: (लेखन) सजवणे
१ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१६
१. मुखपृष्ठ
२. चित्रं इ.
३. मुद्रितशोधन
टोलनाका: फायनल धागे चावडीत प्रकाशित करणे
टप्पा ४: सादर करणे
३० ऑक्टोबर २०१६
प्रकाशन! आणिक काय!
____________________________________
चमू:
१. प्रोजेक्ट मॅनेजर्स
सब चीज पिल्यान के मुताबिक होतीय ना हे पाहणे ही मुख्य जबाबदारी आणि डोकं थंड ठेवणे ही दुसरी. ;) यांना या कामासाठी भरपूर वेळ द्यावा लागणार आहे.
२. निमंत्रितांसाठी हँडलर्स
निमंत्रित लेखकांशी संपर्क करणे, त्यांच्याकडून लिहवून घेणे, वेळोवेळी फॉलो-अप ठेवणे, लेखनाचं संपादन करणे वगैरे. निमंत्रिताशी मिपाबाह्य दोस्ती असेल तर हे काम सोपं होतं हा वैयक्तिक अनुभव आहे, पण हे अर्थातच हवंच असं नाही.
३. चित्रकार
याबद्दल वेगळं काय लिहिणार? मुखपृष्ठ आणि लेखांच्या आत चित्रं काढणे. एक प्रश्नः यात लेआऊट येतं का? मिपामध्ये हे प्रयोग फारसे पाहिलेले नाहीत.
४. मुद्रितशोधन
याबद्दलही वेगळं काय लिहिणार?!
____________________________________
तर हुंद्या चर्चा!