मिपागणेश चित्रमाला

नमस्कार मंडळी,
http://misalpav.com/node/36593 हा धागा वाचनात आला असेलच. मिपागणेशचित्रमालेला मिपाकरांचा कसा प्रतिसाद मिळेल याचा कल जाणून घेण्यासाठी तो होता. अर्थात बर्‍याच उत्साही मिपाकरांनी धाग्यावर प्रतिसाद दिले, काही मिपाकरांनी व्यनि करुन ह्यात सहभागी व्हायची तयारी दाखवली हे वातावरण उत्साही असेच आहे.
तर मिपागणेश चित्रमालेचा उद्देश असा आहे की बरचसे मिपाकर वेगवेगळ्या कलांची आराधना करत असतात. त्यांचे दृश्य स्वरुप वेगवेगळे असु शकते. काही काव्ये/कथा लिहितात, काही चित्र काढतात, काही ओरिगामी करतात, काहीजण म्युरल्स, स्कल्पचर सुध्दा करत असतात. त्या सर्वांना एका प्लॅटफोर्मवर कसे आणायचे? त्याला गॅलरी तर सद्य स्वरुपात आपण देउ शकत नाही. मग एक दृश्य स्वरुप म्हणजे मिपांचे बॅनर्स. त्यावर त्या कला कशा आणता येतील ह्यादृष्टीने विचार करता गणेशचित्रमालेची आयडीया आली.
आता मिपाकरांनी पाठवलेली वेगवेगळ्या स्वरुपातली निवडक गणेश रुपे १० दिवस गणेशोत्सवात १० बॅनरचे रुप घेउन येतील. सोबत साईड बॅनरला मूळ कलाकॄती कलाकाराच्या नावासह असेल. उरलेल्या चित्रकृतींना आपण सेपरेट धाग्याचे स्वरुप देउन कलादालनात ठेवणार आहोत. ह्यामुळे अजून एक गोष्ट घडेल की काही नवीन नवख्या कलाकारांना आपली कलाकृती ग्राफीकली किती वेगळ्या स्वरुपात रिप्रेझेन्ट होउ शकते याचा कॉन्फीडन्स मिळेल. ह्यातूनच काही नवीन कलाकार मिपाला मिळू शकतील.
रंगभुषा मंडळाचा हा पहिलाच उपक्रम असल्याने ह्याला मिपाकरांचा कसा प्रतिसाद मिळतोय त्यानुसार आगामी उपक्रमाची रुपरेषा तयार करता येईल.
रंगभूषा मंडळाला स्वतंत्र आयडी तयार करुन दिलेलाच आहे. रंगभुषा मंडळ ह्या उपक्रमात प्रशांत आणि नीलकांत मालकांचे मर्गदर्शन आहेच त्यांच्या संपर्कात राहून हा गणेश चित्रमालेचा उपक्रम यशस्वी होइलच ह्याची खात्री पटलीये.
उपक्रमाविषयी काही कलाविषयक सूचना असल्यास अवश्य सांगाव्यात.
धन्यवाद.