विशेषांक चावड़ी

नमस्कार,

मिपावर वेळोवेळी होणाऱ्या विशेषांक आणि लेखमालाचे कामकाज सुसूत्रित पद्धतीने करता यावे म्हणून खालील दोन विभाग सुरू करीत आहोत. साहित्य संपादक, संपादक आणि सल्लागार मंडाळींना या विभागांद्वारे समन्वय साधता येईल, तसेच इतर सदस्य जे अंकांच्या कामात सहभागी असतील त्यांना तात्पुरता एक्सेस देता येईल अशी कल्पना आहे.

अंकासाठी ईतर कुणाची मदत लागली असल्यास आधी चर्चा मिपासंवाद मधे करावी

अंकाची कल्पना, धोरण, संपादन आणि प्रकाशन या मुख्य भूमिका साहित्य संपादकांच्याच असतील, यात काहीही बदल अपेक्षित नाही.

विशेषांक / लेखमाला

विशेषांक आणि लेखमालाचे कामकाज करण्यासाठी हा विभाग आहे
इथे टाकलेले लेख सुरुवातीला फक्त विशेषांक चावड़ी मध्ये दिसतील , लेखाचे संपादन मु. शु येथेच करता येइल
कृपया लेख साहित्य संपादक च्या नावाने पब्लिश करावा

विशेषांक चावड़ी

विशेषांक आणि लेखमालाचे यांच्याबाबत चर्चा व कामकाज करण्यासाठी हां विभाग आहे. अंकाची कल्पना, नियोजन आणि डेडलाईनस इथे चर्चिल्या जाऊ शकतील. साहित्य संपादक, संपादक आणि सल्लागार मंडाळींना नवीन अंकाच्या कल्पनांबद्दलही इथे बोलता येईल.
सध्याचे २०१६चे मिपा केलेंडर इथे हलवून स्टिकी पद्धतीने वर आणून ठेवले आहे.

कळावे, लोभ असावा.

आपलाच,
प्रशांत