१) कधी उमलतोय आणि आपला सुगंध आसमंतात दरवळवतोय अस झालय.
२) हे आमच्या कुंडीत फुललेल मे फ्लावर. जणूकाही सृष्टीतील आनंद साजरा करणारा फुलबाजाच.
३) आम्ही क्वचीतच फुलतो. पण फुलाव तर आमच्यासारख स्वतःबरोबर ज्यांनी आधार दिला त्यांनाही सुरंगी कराव.
आमचे गुच्छही आम्ही असे एकमेकांचे हात धरून, एकत्र राहून बनवतो.
५) आज कसा मनासारखा पाऊस अंगावर रिमझिमला. चिंब चिंब झाल.
६) राणीच्या बागेत तुमच स्वागत आहे अश्या पोज मध्ये हे फुल राणीच्या बागेत होत.
७) नाव माझ पावडर पफ असल तरी त्याहून मी खुप नाजूक आहे.
८) फुलांचे राजे म्हणतात आम्हाला.
९) आम्हाला बाई स्वच्छ, शुभ्रच आवडत.
११) आकाशाकडून रंगाची उधळण घेऊन आलोय आम्ही.
खालचे फोटो माझी मुलगी श्रावणी हिने काढलेत. माझ्या माहेरी.
१२)लहान मुलांचे फ्रॉक, पर्सला अशी फुले किंवा बटन्स किती छान दिसतील.
१३) अगो बाई कॅमेरा हातात धरण्याएवढी इतकी मोठी झालीस लगेच अस म्हणत आहे ते फुल.
१४) हे फुल वळून वळून सांगत आहे "एक माझा पण काढ ना एक छानसा फोटो, डिपी ठेवता येईल असा".