श्रीगणेश लेखमाला २०१६

नमस्कार !
५ सप्टेंबर ला गणेश चतुर्थी आणि मिपाचा नववा वर्धापनदिन.
यानिमित्ताने आपण दरवर्षी श्रीगणेश लेखमाला आयोजित करतो. यंदा ही जबाबदारी सासंच्या वतीने माझ्याकडे आहे. (संदर्भ : मिसळपाव दिनदर्शिका २०१६ )

चर्चेतून, ‘व्यवसाय सांभाळून जोपासलेला माझा छंद’ (अर्थात मिपाकरांनी) असा विषय पुढे आला आहे. असे मिपाकर पाहण्यात आलेले असे आहेत.
मालोजीराव - इतिहास संशोधन
वल्ली (प्रचेतस) - शिल्प संशोधन
मोदक - सायकलिंग
सतीश कुडतरकर - ट्रेकर
बॅटमॅन - इतिहास संशोधन
विशाखा पाटील - लेखन
एस - फोटोग्राफी
नीलकांत - मिसळपाव
गणपा - पाककृती
माहितगार - विकी मराठी
बोका-ए-आझम - अनुवाद
एक्काकाका – भटकंती
नूलकरकाका – जैंवविश्व
एकूण किमान दहा लेख यायला हवेत. तरीही वरीलपेक्षा आणखी काही मिपाकर माहिती असल्यास कृपया इथे अ‍ॅडवावे.
श्रीगणेशकृपेने व आपणा सर्वांच्या सहाय्याने हीही लेखमाला यशस्वी होईलच.
लेखमालेसंबंधी चर्चा व सूचना इथे कराव्यात.