कोण जिंकणार युरोकप 2016 ??????

मिपावर फूटबॉलचा धागा नाही हे बघून आश्चर्य वाटले, म्हणून म्हंतल आपणच सुरूवात करावी.
खेळांचा राजा फूटबॉलची युरोप मधील सर्वोच्च मानाची आणि तुफान प्रसिद्धीची युरोकप 2016 हि स्पर्धा आता तिच्या आंतीम टप्प्यात येत आहे.
सुरुवातीचे साखळी सामने आणि राउंड ऑफ सिक्सटीन संपून आता संघ क्वॉर्टर फाइनल मध्ये दाखल झाले आहे.
येऊ घातलेल्या सामान्यांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे (कंसात माझ्या मते संभाव्य विजेते) :
- पोलंड वि. पोर्तुगल - ३० जून (पोर्तुगल)
- वेल्स वि. बेल्जियम - १ जुलै ( बेल्जियम चा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे)
- जर्मनी वि. इटली - २ जुलै (काट्याची टक्कर, शेरास सव्वाशेर काही सांगता येत नाही बहुदा शिस्तबद्ध खेळ करून जर्मनी बाजी मारेल)
- फ्रांस वि. आइयर्लॅंड - ३ जुलै (फ्रांस, आइयर्लॅंड सुद्धा दणका देऊ शकते हे त्यानी इंग्लेंड ला हरवून दाखवून दिल आहे)

सर्वच संघ जोमात आहेत आणि सामने सुद्धा रंगतदार होत आहेत. एकूणच स्पर्धा बघता माझा कौल जर्मनी ला आहे. ज्यांचा खेळ बघायला आवडतो असे खेळाडू : गोमेज़, ओझील, क्रूअस, श्वैन्स्ताग्गेर्, आणि थॉमस मुल्ल्लर(अजुन खाते उघडले नाही). इतर देशांचे म्हणाल तर रोनाल्डो, नानी, पेले, हज़ार्ड, चिलीनी, ग्रीझमान.
जास जसे सामने होतील तसे तसे अजुन चर्चा करू. तोपर्यंत तुमचे कौल आणि आवडीचे खेळाडू कळवा.