रासबेरी पाय - थोडक्यात ओळख

प्रस्तावना : गावडे सरांनी ह्या इथे rbp केलेल्या विनंती वजा आज्ञेचा मान राखुन रासबेरी पाय ह्या भन्नाट गोष्टीची माहीती देण्यास हा एक अत्यंत छोटेखानी धागा काढत आहे !
__________________________________________________________
रासबेरी पाय Raspberry Pi

कल्पना करा की तुम्ही तुमचा कॉम्प्युटर खिषात घेवुन फिरु शकलात तर काय मजा येईल ! तसेही लॅपटॉप आपण पाठीवर घेवुन फिरतोच पण समजा आपल्या स्मार्टफोन प्रमाणे तुम्ही खिषात घेवुन फिरुशकलात तर काय मजा येईल नै !
ह्म्म .... नाहीना कल्पना करता येत .... "त्यात काय विशेष ? "असा प्रश्न पडतोय ना ? असु दे . बर्‍याच जणांचे असेच होते. फक्त जे अट्टल 'कोड'गे ( कॉम्प्युटर कोड सोबत 'खेळत खेळत' रात्र रात्र 'जागवणारे') आहेत तेच ही कल्पना व्यवस्थित रंगवु शकतील !

तर .... रासबेरी पाय हा तुमच्या खिषात मावु शकेल इतक्या छोट्या आकाराचा क्रेडीटकार्ड साईझ सिंगल बोर्ड कॉम्पुटर आहे !
'रासबेरी तद्दन बकवास लागते , रादर मलबेरीच्या पुढे सगळ्याच बेरी भिकार लागतात' असे आमचे वैयक्तिक मत आहे पण ते असो , तात्विक मतभेद असले तरी दीर्घद्वेषीपणा न ठेवता , चांगल्या गुणांची कदर करायची सवय असल्याने असल्याने रासबेरी पाय च्या प्रेमात पडलो आहोत.

ही पहा रासबेरी पाय ची मुख्य साईट : https://www.raspberrypi.org/

हा रासबेरी पाय चा लोगो
1

हा रासबेरी पाय ३ चा फोटु
1

आता ह्याचे कॉन्फिगरेशन ऐका :
१)ऑपरेटींग सिस्टीम : रासबीयन (डेबीयन ह्या लिनिक्स च्या कर्नल सारखीच खास ह्या रासबेरी साठी बनवलेली१)
२)प्रोसेसर : ब्रॅडकॉम २८३५
३) सीपीयु: 1200 MHz quad-core ARM Cortex-A53
४) रॅम : 1 ग्ब
५) स्टोरेज ( हार्ड डिक ) : मायक्रो एस डी कार्ड ( नक्की माहीत नाही पण बहुतेक ८ ते १६ ग्ब पर्यंत वापरता येते )
६) कनेक्टीव्हिटी : इन्बिल्ट ब्लुटूठ , इन्बिल्ट वायफाय , इथर नेट , एच डी एम आय आऊट पुट !
७) इतर वैशिष्ठे : तब्बल चार यु एस बी पोर्ट ! ऑडियो विडीयो ऑटपुट जॅक , स्टॅट्स एलीडी , कॅमेरा जोडायला जॅक

८) पावर : मायक्रो यु एस बी पिन ( आपल्या मोबाईल चार्ज करायला वापरतो ती ) आपल्या मोबाईल ला लागते तेवढी पावर १.५ म्ह्झ पुरते !! ९) सर्वात महत्वाचे म्हणजे तब्बल ४० जनरल परपज इन्पुट आउटपुट पिन्स ( मेल) ! ह्यांना सतराशे साठ प्रकारचे सेन्सर बसवु शकतो आपण ! ( सर्वांची नावे लिहित बसत नाही हा पहा अ‍ॅमेझॉन वर सापडलेल फोटू )
a

अहो पण ह्याचे करायचे काय ?
तर काँपुटर वर जे जे करता येते ते ते सारे करता येते ह्याच्यावर !! तरीही कल्पना यावी म्हणुन युटुब वर मिळालेल्या ह्या काही खतरनाक कलाकृत्या :

१) मायक्रॉफ्ट : आर्टीफिशीयल इन्टेलीजन्स फॉर ऑल थोडक्यात गरीबांचा जार्विस !
https://www.youtube.com/embed/WsOVvrTItZM

२) पाय टॉप
https://www.youtube.com/embed/jb6hVe1fRzI

३)पा फोन
https://www.youtube.com/embed/8eaiNsFhtI8

४) ऑटोमेटेड ड्रायव्हिंग
https://www.youtube.com/embed/BBwEF6WBUQs

५) अजुन काही प्रोजेक्ट
https://www.youtube.com/embed/9YhTOUu06EY

हुश्श . आता एक महत्वाची गोष्ट

" ह्याची किंमत काय ? "
फक्त ३५ डॉलरा ! २५०० रुपये बस्स !!

आता कल्पना करा की ह्या इतक्या स्वस्तातल्या कॉम्पुटर वापरुन आपण काय काय करु शकतो ते , होम ऑटोमेशन , रोबोटिक्स , सेक्र्युरीटी मॉनिटरींग , ह्यॅकिंग डिव्हाईसेस , एडुकेशन डिव्हाईसेस अन अजुन काय काय !!

आता अजुन एक धक्का देवु का ?
हा पहा रासबेरी पाय झीरो : किम्मत फक्त ५ डॉलरा : ३५० रुपये !!

0

हे सारे झाले टेक्निकल पण सर्वात महत्वाचा प्रश्न अजुन राहातो की , लेमॅन लोकांना सर्वसामान्य ह्याचा काय उपेग ? तर ह्यावर जरा गांभीर्याने विचार करु : आपल्या देशात तब्बल १००- ११० कोटी लोकं रहातात , त्यातल्या किती लोकांपर्यंत आज कॉम्पुटर पोहचला आहे ? सोडा , कॉम्पुटर दुरची बात किती गावात व्यवस्थित वीज पोहचली आहे ? किती शाळात मुलांना रीतसर कॉम्प्युटर चे प्रशिक्षण मिळते ? माझ्या अंदाजे २५ ते ५० कोटी पेक्षा जास्त नसावेत , उद्या , भविष्यकाळ कठोर आहे , कॉम्पुटर येत नसेल तर तुम्ही असिक्षित आहात ! कॉम्पुटर व टेक्नॉलोजी चा जर ह्या देशात प्रसार झाला नाही तर गिनि कॉईफिशंट किती वाढेल , सोप्प्या शब्दात , गरीब श्रीमंत , शिक्षित अशिक्षित ही दरी किती वाढेल ? फेसबुक वगैरे सोशल मीडीया अन स्मार्टफोन्स आल्यापासुन ह्या सारा सोशियोएकॉनोमिक बदलांची नांदी आपण पहातोच आहोत , भविष्यासाठी संगणक साक्षरता ही गोरगरीबांपरयंत पोहचवणे अनिवार्य आहे .
कल्पना करा की हा ३५० रुपायाचा रासबेरी पाय वापरुन , अन १००० रुपायात बॅटरी अन डिस्प्ले ची सोय करुन फक्त २०००- २५०० मध्ये आपण एक फुल्ल फ्लेजड संगणक तयार करु शकतो जो संपुरण प्रोग्रामिङ साठी वापरता येईल तसेच वीजेच्या उपलब्धतेवर जास्त अवलंबुन नसेल ! किती लोकांपर्यंत पोहचवता येईल संगणक !! समाजसेवेसोबत समाजसेवा अन शिवाय बिजीनेस चा बिजीनेस ही होईल !! हे मनावर घेवुन कोणीतरी करणे गरजेचे आहे. . आम्हीच केले असते हो , पण आधी म्हणल्याप्रमाणे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कर्वे आगरकर सावरकरांच्या समाजकार्याला शष्प किंमत उरली नाहीये हे कटु सत्य आहे म्हणुन आपण आपले दुसर्‍यास ठेच मागचा शहाणा ह्या नियमाने शहाणे होवुन कोणत्याही प्रकारच्या समाजसेवेपासुन दुरच राहिलेले बरे ! जर संगणक साक्षरता गोरगरीबांपर्यंत नाही पोहचली तर आज जे आम्ही हिंजेवाडीत पहात आहोत की एकीकडे ब्लुरीज चे टॉवर चे टॉवर वाढत चालले आहेत , एक एक दोन दोन करोड रुपायाची घरे आहेत अन दुसरी कडे गेटवरचा वॉचमन ला ३० हजार पण पगार नाय ! पलीकडे झोपड्यात रहाणार्‍यांचा विषयच नको ! ही परीस्थिती सार्वत्रिक दिसेल जे की खुप गंभीर आहे.
ह्म्म असोच्च ! आमचे आपले स्वत:चे पॅरानॉईड निरर्थक स्वात्मचिंतन ! सोडा !

तर ही होती रासबेरी पाय ह्या एका भन्नाट गोष्टीची थोडक्यात ओळख !बाकी लोकांनी ह्या माहीतीत जरुर भर घालावी . बाकी लेख संप्वताना हा आम्हाला भावलेला एक क्युटी क्युटी रासबेरी पाय प्रोजेक्ट : टॉकिंग चॅटर पाय फोन

q

______________________________________________________

अवांतर : हा रासबेरी पाय अन हॉस्पिटल मध्ये वापरतात ती मेडीकल डिव्हाईसेस चे सेन्सर बनवुन आपण जर पुर्ण ह्युमन लाईफ स्टॅटिस्टिक्स बीपी , शुगर लेव्हल , बॉडी टेम्परेचर, ब्रेन फक्श्न, स्लीप पॅटर्न्स्, ड्रीम पॅटर्न्स , युरीन, स्टूल स्टॅटिस्टिक्स , हार्मोन्स स्टॅटिस्तिक्स वगैरे वगैरे जर रीयल टाईममध्ये ऑनलाईन आणु शकलो तर काय मजा येईल राव ! पुढे मागे असे काही करावे असा आमचा विचार आहे :)