लहानपणी शाळेत असताना एखाद्या बोरिंग तासाला, वह्यांच्या मागच्या पानांवर पानभर ही असली डिजाईन्स काढत बसायचो. आईला कळायच नाही की मला माझ्या बहिणींच्या तुलनेत पेनाची रिफील सारखी का लागते. त्या वेळेला रीफिलला आमच्याकडे "कांडी" म्हणत. एकदा आईला कळाल आणि जाम खरडपट्टी निघाली. शाळेतही कधी कुठल्या शिक्षकांनी पाहिलं की ते रागवत. पण मला ते कांडी संपवण आवडे. तासनतास त्यात कसा वेळ जाई कळायचेच नाही. अजूनही असलं काही काढत बसलो की जी तल्लीनता पदरी पडते ती आणि त्यामुळे मनाला जी वेगळीच उभारी मिळते त्याला तोड नाही.
माझ कांडी संपवण कस वाटतय ते नक्की सांगा. ह्याला चित्रप्रकाराला नक्की कुठला प्रकार म्हणायचे किंवा ह्याचे काय करता येईल असे काहीच माहीत नसल्यामुळे मिपावरील जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती!
सर्व काही पेनानेच रेखाटले आहे फक्त चांगले दिसावे म्हणून फोटोशॉपमधून मागे चित्र, कलरिंग वगैरे नट्टापट्टा इ. प्रकार केले आहेत.
डिजाईन १)

डिजाईन २)

धन्यवाद,
Sandy