नमस्कार मंडळी,
गेल्या वर्षभरात अनेक उपक्रम आपण यशस्वीपणे राबवले. याच धर्तीवर एका नव्या उपक्रमाची कल्पना सुचली.
कल्पना अशी आहे की आजवर मिपावर सदस्यत्व घेऊनही कधीच स्वतःचे लेखन लिहून प्रकाशित केले नसेल अशांसाठी विशेष उपक्रम राबवला जावा. एक घोषणेचा धागा टाकून अशा मिपाकरांकडून नावे घेऊया अन नंतर आपल्यापैकी प्रत्येकाने किमान एका मिपाकराचे Mentor (सल्लागार) बनूया.
भरपूर प्रतिसाद मिळाला तर आपल्यापैकी प्रत्येकाला एकाहून अधिक मिपाकरांचे Mentor बनावे लागेल. अशा लेखकांना लिहिते करण्यासाठी हवे ते मार्गदर्शन आपण करूया अर्थात त्यांचा सकारात्मक व उत्साही प्रतिसाद ही प्राथमिक गरज असेल.
लेखनविषय आपण त्यांच्याकडून मागवू शकतो किंवा आपण आपल्यात चर्चा करुन नवलेखकांसाठी विषयांची यादी बनवू शकतो.
प्रथमतः या प्रस्तावार सांगोपांग चर्चा करुया.