मिपाकरहो नमस्कार,
मिपा विडंबन स्पर्धा मोठी रंगतदार झाली. आणि तिच्यात रंग भरण्याचं काम स्पर्धकांनी जितकं चोख केलं, तितकंच मतदात्यांनीही केलं.
प्रेम, राजकारण, फजिती अशा तीनही विषयांच्या प्रवेशिकांना भरपूर मतदान झालं. वाचकांनी त्यांचा मनसोक्त आस्वादही घेतला. बुरा ना मानो होली है! ही उक्ती सार्थ ठरवत अवघ्या मिपाविश्वाने या सगळ्याची मजा लुटली.
आता शेवटचा टप्पा; निकालाचा. प्रत्येक विषयाचे अग्रणी तीन क्रमांक इथे जाहीर करत आहोत. त्यातील पहिला क्रमांक अर्थातच त्या विषयाच्या विडंबन स्पर्धेचा विजेता आहे.
प्रेम :
प्रथम क्रमांक - ज्ञानोबाचे पैजार - लव्ह करणे तुजवरती
द्वितीय क्रमांक - बहुगुणी - जेव्हा तिची नि माझी ठरवून भेट झाली
तृतीय क्रमांक - नीलमोहर - प्रेम कर हरणीसारखं
---------------------------------------------------
राजकारण :
प्रथम क्रमांक - सर्वसाक्षी - मताचे श्लोक
द्वितीय क्रमांक - आनंद मोरे - परत ये रे मल्ल्या
तृतीय क्रमांक - बहुगुणी - देता मते कुणाला
---------------------------------------------------
फजिती :
प्रथम क्रमांक - स्वामी संकेतानंद - ओल्ड मंक येता येता
द्वितीय क्रमांक - ज्ञानोबाचे पैजार - चांगली खोली दिलीस देवा
तृतीय क्रमांक - बहुगुणी - हनुवटी रुतुनी आहे
---------------------------------------------------
वरील स्पर्धक व विजेत्या विडंबनांव्यतिरिक्त आलेली इतर सर्वच विडंबनं एकापेक्षा एक सरस होती, आणि ती आपण सगळ्यांनीही बघितलीतच. पण स्पर्धा म्हटलं की चुरस, चुरस म्हटलं की विजेतेपद हे सगळं आलंच. त्यामुळे मिपातर्फे विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचं मनापासून कौतुक. विजेत्यांना व्यनितून त्यांचं प्रशस्तीपत्रक धाडण्यात येईल.
बाकी काही म्हणा, रंगांचं कसं असतं, की एकटाच एकटा रंग तितका खुलून दिसत नाही. पण रंग जेंव्हा एकमेकात मिसळतात ना, तेंव्हा खरी धमाल येते. मिपाचं सार नेमकं हेच आहे. मिसळा आणि उधळा; मग एकच धुरळा !
चांगभलं !