मूळ काव्य :- पद्मबंध
काव्यसंग्रह :- सांजभयाच्या साजणी
कवी - ग्रेस
सूर्य बुडे, ऊन ढळे
उचल पाय चल गं ! बये !
चिखलावर कमळांचा
भार कधी टाकू नये
घाटातुन घंटांचे
घोर नाद थरथरती;
पणतीला वाऱ्याचा
धाक कधी घालु नये
ताऱ्यांची दीर्घ शीळ
संध्येची गगनहाक;
चंद्रावर चंद्राचा
अस्तउदय लादू नये!
संगनमत सरितांचे
लहरींचा बहरतोल;
पाण्यावर तृष्णेचा
पेच नवा ठेवु नये
विडंबन --
शीर्षक :- छद्मबंध
कवी :- स्वामी संकेतानंद
हत्ति डुले , हात हले
उचल सायकल गं बये !
झाडूने कमळांची
रास कधी झाडू नये
घाटातून घडीचे
चोर काटे कुजबुजती
बाणाला इंजिनचा
धाक कधी घालू नये
'गोदो'ची तीच रीळ
'स्यूडो'ची गगनहाक
हातावर हाताचा
अस्तउदय लादू नये
संगनमत ललितांचे
ममताचा असमतोल
जनतेवर डाव्यांचा
पेच नवा ठेवू नये