विडंबन स्पर्धा प्रवेशिका - बाजीगर - राजकारण१

प्रेषक:बाजीगर

आरती प्रभूंची क्षमा मागुन,

ठकतंत्रांचे देणे...

गेले द्यायचे राहून तुझे करोडोंचे देणे
माझ्यापास आता खळ्या आणि कॅलेंडर पाने

झालो होतो नाचत मी, काही खासांसाठी फक्त
हव्यासांचे ओझे आता, हा तर मात्र शोधी ट्विट

आता बीअरचा 'मग'ड ,घेतो म्हणत कशाला
होते मूल्यांचे (मल्याचे ?)निर्माल्य आणि विमानांचा पाचोळा

मूळ कविता,
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू)

गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त

आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा